शिर्डी साई मंदिरात भक्तांसाठी ड्रेसकोड,पाहा ‘हे’आहेत नियम

समाधीचे दर्शन घेण्यासाठी भारतीय संस्कृतीनुसार वेशभूषा करावी l indian culture

shirdi-sai-mandir-dress-code-for-devotees
shirdi-sai-mandir-dress-code-for-devotees

शिर्डी l शिर्डीमधील साई मंदिरात दर्शनासाठी Shirdi sai Temple देश विदेशातून लोक  येत असतात. दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड Dress code for devotees लागू करण्यात आला आहे. तसा फलकच मंदिराबाहेर लावण्यात आला आहे.

मंदिर परिसरात फ्लेक्स बोर्ड लावून भक्तांना सूचना करण्यात आली आहे की, समाधीचे दर्शन घेण्यासाठी भारतीय संस्कृतीनुसार indian culture वेशभूषा dress करावी. असा निर्णय साई संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.

कोरोना महामारीमुळे साईबाबा मंदिर Sai baba Temple गेल्या ८ महिन्यापासून बंद होते. दरम्यान दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र सरकारने मंदिरे उघडण्यासाचा निर्णय घेतल्यानंतर साई संस्थानने ही विनंती वजा सूचना भक्तांसाठी दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार मिळाल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जातांना? ही नियमावली पाहा

 दर्शनासाठी भाविकांना ऑनलाइन पास घ्यावा लागणार आहे.

 ठरवून देण्यात आलेली वेळ आणि तारखेनुसार भाविकांना दर्शन दिलं जाणार आहे.

 ३००० भाविकांना ऑनलाइन पेड पास दिला जाणार आहे. 
 

 आरतीसाठी २५० ते ३०० भाविक उपस्थित असत. मात्र यावेळी आरतीसाठी ५० जणांनाच

सहभागी होता जाणार आहे. आरतीसाठी पास आरक्षित असणार आहे.

 हार, फुलं, प्रसाद मंदिरात नेता येणार नाही. समाधीला हात न लावता दर्शन घेता येणार.

 मोबाइल आणि इतर वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

 आरतीनंतर गावकऱ्यांना दर्शनासाठी विशेष प्रवेश दिला जाणार. मतदार ओळखपत्र

दाखवल्यानंरच प्रवेश दिला जाईल.

६५ वर्षांवरील नागरिक, १० वर्षांखालील मुले, व्याधीग्रस्त तसेच गर्भवतींना प्रवेश दिला जाणार नाही. राज्य सरकारनेच तसा आदेश दिला आहे.

साई निवास व्यवस्थेसाठी ऑनलाइन बुकिंग करावी लागणार आहे.

मास्क बंधनकारक असणार आहे.

थर्मल स्क्रिनिंग आणि नियम पाळणं बंधनकारक आहे.

हेही वाचा l  यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here