शिवसेनेचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं : आदित्य ठाकरे

aditya-thackeray-slams-rebel-camp-as-shiv-sena-splits-in-the-lok-sabha-with-12-mps-joining-shinde-group-news-update-today
aditya-thackeray-slams-rebel-camp-as-shiv-sena-splits-in-the-lok-sabha-with-12-mps-joining-shinde-group-news-update-today

मुंबई l भाजपाकडून Bjp शिवसेनेवर Shivsena हिंदुत्वाच्या hundustwa मुद्द्यावरुन टीका केली जाते. दरम्यान, शिवसेनेचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा वेगळं असल्याची भूमिका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांनी मांडली. आमचं हिंदुत्व भाजपाच्या हिंदुत्वापेक्षा निराळं आहे. प्रत्येकाचा आदर करा, सन्मान करा. कर्म हीच आस्था आहे. हेच माझं हिंदुत्व आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त एका मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं.“आमचं भाजपाचं हिंदुत्व राजकीय हिंदुत्व आहे. ते माय वे या हाय वे याचा अवलंब करतात. जर ते आपल्या हिंदुत्वाला योग्य मानतात तर पीडीपी सोबत कसे गेले? आम्ही त्यांच्या सोबत होतो.

परंतु त्यांनी पाठीत खंजीर खुपसला. हेच का त्यांचं हिंदुत्व? त्यांचं एका राज्यात वेगळं हिंदुत्व दुसऱ्या राज्यात वेगळं हिंदुत्व असतं. आमच्यासाठी हिंदुत्व राजकीय वस्तू नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

वाचा l शिर्डी साई मंदिरात भक्तांसाठी ड्रेसकोड, पाहा ‘हे’ आहेत नियम

गेल्या एक वर्षात तुम्ही विरोधकांच्या निशाण्यावर होतात, अनेक आरोप झाले असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. “त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं जास्त योग्य असल्याचा मी विचार केला.

कामावर संपूर्ण लक्ष असल्याने तिकडे लक्ष गेलं नाही. महाविकास आघाडी चांगलं काम करत असून कोणीही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत ही आमच्यासाठी  दिलासा देणारी बाब आहे.

यामुळे चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले झाले. पण पाच वर्ष आम्ही काम करु, राजकारण नाही,” असं आदित्य ठाकरे म्हणाले

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here