‘ईडी-पीडी’ बालंट त्यांनी चुटकीसरशी दूर केले; सात-आठ शिबिरार्थी महाशक्तीचे चरणदास झाले!

शिवसेना बंडखोर आमदारांवर सामनातून टीकास्त्र

Shiv-sena-mouthpiece-saamana- editorial-slams-eknath-shinde-and-rebellion-mlas-news-update-today
Shiv-sena-mouthpiece-saamana- editorial-slams-eknath-shinde-and-rebellion-mlas-news-update-today

मुंबई: एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) अनेक आमदारांनी बंडखोरी केल्यानं शिवसेना कात्रीत सापडली आहे. आमदारांच्या बंडखोरीमागच्या कारणांचीही चर्चा होत असून, शिवसेनेनं एकनाथ शिंदेंसह सर्वच आमदारांवर टीकास्त्र डागलं आहे. योग शिबिरात सामील झालेल्या किमान सात-आठ जणांवरचे ‘ईडी-पीडी’ बालंट त्यांनी चुटकीसरशी दूर केले. त्यामुळे हे सात-आठ शिबिरार्थी महाशक्तीचे एकदम चरणदास झाले,”असं म्हणत शिवसेनेनं ईडीच्या कारवाया सुरू असलेल्या आमदारांवर सामनाच्या अग्रलेखातून तोफ डागली आहे. ईडीच्या (ED) कारवायांचा हवाला देत शिवसेनेनं बंडखोरांसह भाजपलाही (BJP) टोले लगावले आहेत.

सामना अग्रलेखात शिवसेनेनं म्हटलं आहे की, “महाराष्ट्राचेच नव्हे, तर अखिल हिंदुस्थानचे डोळे ज्याकडे लागले होते ते कार्य पूर्ण होताना दिसत आहे. सुरतच्या ‘मेरिडिअन’ हॉटेलमध्ये अर्धवट राहिलेले ‘चिंतन’ कार्य अखेर ईशान्येकडील गुवाहाटी शहरात मार्गी लागले. त्या शिबिरात असा ठराव संमत झाला की, ‘भाजप एक महाशक्ती आहे. ही महाशक्ती आपल्या पाठीशी असल्याने आपल्याला चिंता नाही.’ आसामच्या योग शिबिरात जे चाळिसेक योगार्थी आहेत ते कोण व कोठून आले, ते आता अखिल भारताला समजले.”

“शिवसेनेचे पळवून नेलेले चाळिसेक आमदार गुवाहाटीमध्ये असून त्यांची चोख व्यवस्था भाजपने केल्याने या महाशक्तीचा काही जणांना नव्याने साक्षात्कार झालेला दिसतो. योग शिबिराच्या प्रमुखांनी त्यांची भूमिका अधिक सुस्पष्ट करताना जाहीर केले की, ‘भाजप या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकवला आहे. त्या महाशक्तीचा आपल्याला पाठिंबा आहे.’ आसामातून अनेक दिव्य विचार सध्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचत आहेत. हिंदुत्वापासून स्वाभिमानापर्यंत नव्याने साक्षात्कार होत आहेत,” असा टोला शिवसेनेनं लगावला.

“या महाशक्तीने पाकिस्तानला धडा शिकविला म्हणजे काय केले? योग शिबिरातील मंडळींना पाकिस्तानबाबत जे ज्ञान मिळत आहे, त्यावर काय बोलावे? पाकिस्तानची जिरवली किंवा पाकिस्तानला धडा शिकवल्याचे कोणते नवे पुरावे गुवाहाटीच्या योग शिबिरात समोर आणले? कश्मीरात पाकिस्तानची घुसखोरी कायम आहेच, पण मोठ्या प्रमाणात हिंदू पंडितांचे हत्याकांड सुरू आहे.”

“भाजप ही महाशक्ती वगैरे असल्याचे ज्यांना आता नव्याने उमजू लागले, त्यांनी कश्मिरी पंडितांच्या हत्येचा जाब गुवाहाटीच्या योग शिबिरातच विचारायला हवा, पण एका अर्थाने भाजप म्हणजे खरोखरच महाशक्ती आहे हे मानावेच लागेल. योग शिबिरात सामील झालेल्या किमान सात-आठ जणांवरचे ‘ईडी-पीडी’ बालंट त्यांनी चुटकीसरशी दूर केले. त्यामुळे हे सात-आठ शिबिरार्थी महाशक्तीचे एकदम चरणदास झाले,”असं म्हणत शिवसेनेनं ईडीच्या कारवाया सुरू असलेल्या आमदारांवर तोफ डागली आहे.

हेही वाचा – ज्या  शिवसेनेचे बोट धरून राज्यात वाढले त्या शिवसेनेला संपवण्याचा भाजपचा डाव

“गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे व भाडोत्री लोकांना पकडून त्यांच्या तोंडून स्वतःच्या ‘महान’पणाचा गजर करून घेत आहेत. भाजपने पाकिस्तानला धडा शिकविला असे गुवाहाटीच्या योग शिबीरप्रमुखांना वाटत असेल तर मग हाच धडा त्यांच्या नव्या महाशक्तीने लडाखमध्ये घुसून आपली हजारो वर्ग किलोमीटर जमीन बळकावणाऱ्या चीनला का शिकवू नये?,” असा सवाल शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना केला आहे.

“महाराष्ट्र या काळात स्थिर व शांत राहिला तो मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वामुळेच, पण महाशक्तीच्या सहकार्याने गुवाहाटीमधील बाबा ‘योगराज’ हे ठाकरे सरकार घालविण्यासाठी ध्यानसाधना करीत आहेत.”

“गुवाहाटीच्या योग शिबिरामुळे देशातला संपूर्ण विरोधी पक्ष एकवटला आहे. एनकेनप्रकारे सत्ता स्थापन करायचीच, माणसे फोडायची, विकत घ्यायची, आमदारांचा बाजार भरवायचा या प्रवृत्तीविरोधात देश एकवटत आहे. त्यातूनच नव्या लढ्याची तेजस्वी किरणे बाहेर पडतील. जग उगवत्या सूर्याला नमस्कार करते, पण गुवाहाटीच्या योग शिबिरात सर्वच बाबतीत अंधकार आहे,” अशा शब्दात शिवसेनेनं एकनाथ शिंदे आणि बंडखोरांवर निशाणा साधला आहे.

“भाजप ही महाशक्ती वगैरे असल्याचे ज्यांना आता नव्याने उमजू लागले, त्यांनी कश्मिरी पंडितांच्या हत्येचा जाब गुवाहाटीच्या योग शिबिरातच विचारायला हवा, पण एका अर्थाने भाजप म्हणजे खरोखरच महाशक्ती आहे हे मानावेच लागेल. योग शिबिरात सामील झालेल्या किमान सात-आठ जणांवरचे ‘ईडी-पीडी’ बालंट त्यांनी चुटकीसरशी दूर केले. त्यामुळे हे सात-आठ शिबिरार्थी महाशक्तीचे एकदम चरणदास झाले,”असं म्हणत शिवसेनेनं ईडीच्या कारवाया सुरू असलेल्या आमदारांवर तोफ डागली आहे.

“गुवाहाटीच्या ध्यान शिबिरात जे लोक पळवून, मारून बसवले आहेत, त्यांचा संबंध योगाशी नसून भोगाशी आहे. अशाच भोग्यांना हाताशी धरून भाजप स्वतःला महाशक्ती म्हणून मिरवत आहे व भाडोत्री लोकांना पकडून त्यांच्या तोंडून स्वतःच्या ‘महान’पणाचा गजर करून घेत आहेत. भाजपने पाकिस्तानला धडा शिकविला असे गुवाहाटीच्या योग शिबीरप्रमुखांना वाटत असेल तर मग हाच धडा त्यांच्या नव्या महाशक्तीने लडाखमध्ये घुसून आपली हजारो वर्ग किलोमीटर जमीन बळकावणाऱ्या चीनला का शिकवू नये?,” असा सवाल शिवसेनेनं एकनाथ शिंदेंना केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here