जखमी वाघिणीने एकहाती विजय मिळवला – संजय राऊत

shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update
shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update

मुंबई: पश्चिम बंगालचे कल हाती आले आहेत.West Bengal Election Results  बंगालमध्ये सत्ता परिवर्तन होताना दिसत नाही. बंगालमध्ये भाजपने मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीचं कौतुकच आहे. पण ममता बॅनर्जी यांना हरवणं तितकं सोपं नाही, असा चिमटा शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी काढला होता.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकल्या तर तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा व्यक्तिगत पराभव ठरेल, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. पश्चिम बंगालमध्ये बाजी मारल्यानंतर ममता बॅनर्जी विरोधकांची गोळाबेरीज करून दिल्लीत ठाण मांडून बसतील. तेव्हा काय परिस्थिती निर्माण होईल, यावर देशाच्या राजकारणाची आगामी वाटचाल अवलंबून असेल, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

…तर दिल्लीसही हादरे बसू शकतात: संजय राऊत

2 मे नंतर महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग येईल, असे म्हणणाऱ्यांना मी एवढेच सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील घडामोडींचे हादरे दिल्लालाही बसू शकतात. तसे वातावरण आज देशात आहे. पश्चिम बंगाल हा त्याचा केंद्रबिंदू आहे.

कोरोनामुळे देशातील परिस्थिती हाताबाहेर गेली असली तरी देशातील सत्तावाद आणि राजकारण संपलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्र अस्थिर होईल असे म्हणणाऱ्यांनी दिल्ली स्थिर राहील का, हे सुद्धा पाहावे, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here