Bigg Boss 16: शिव ठाकरे म्हणाला “स्टॅन” माझा भाऊ,त्याचाच ट्रॉफीवर हक्क!

बिग बॉसच्या घरात असताना शिव ठाकरे व एमसी स्टॅन यांची जोडी चांगली होती.

shiv-thakre-reaction-after-mc-stan-won-bigg-boss-16-takes-salman-khan-name-news-update-today
shiv-thakre-reaction-after-mc-stan-won-bigg-boss-16-takes-salman-khan-name-news-update-today

मुंबई:  ‘बिग बॉस १६’ चा (Bigg Boss 16) धमाकेदार ग्रँड फिनाले रविवारी १२ फेब्रुवारी रोजी पार पडला. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन शिव ठाकरे व प्रियंका चहर चौधरीला हरवत बिग बॉसच्या १६ व्या पर्वाचा विजेता ठरला. यावेळी स्टॅनबद्दल शिवला प्रतिक्रिया विचारण्यात आली. शिव म्हणाला “स्टॅन माझा भाऊ आहे. त्याचा ट्रॉफीवर हक्क आहे. त्याच्यावर जनतेचं आणि आमचं खूप प्रेम आहे,” असं शिव ठाकरे म्हणाला. ‘विरल भयानी’ने यांसदर्भात व्हिडीओ शेअर केला आहे.

या घरात असताना शिव ठाकरे व एमसी स्टॅन यांच्या मैत्रीची खूप चर्चा झाली आणि विजेतपदासाठी या दोन जिगरी मित्रांमध्येच अंतिम लढत झाली. एमसी स्टॅनने बाजी मारत ट्रॉफीवर नाव कोरलं.

बिग बॉसचा ग्रँड फिनाले झाल्यानंतर सर्व स्पर्धकांनी होस्ट सलमान खानबरोबर पार्टी केली. त्यावेळी सलमानबरोबर गप्पा मारल्या असं शिवने सांगितलं. तसेच सलमान खानला बघूनच मी बॉडी बनवली, असंही तो म्हणाला. बिग बॉस हिंदीमध्ये खूप मजा आली, मी अमरावतीच्या गल्लीतून इथपर्यंत पोहोचलो, हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट असल्याचं तो म्हणाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान, शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’ चा ग्रँड फिनाले संपल्यानंतर घरी म्हणजेच अमरावतीच्या दिशेने रवाना झाला आहे. अमरावतीसारख्या लहान शहरातून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या शिव ठाकरेने यापूर्वी मराठी बिग बॉसदेखील जिंकलं होतं.

हेही वाचा: MC Stan Wins Bigg Boss 16: रॅपर एमसी स्टॅन ठरला ‘बिग बॉस १६’ चा विजेता; शिव ठाकरे उपविजेता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here