‘प्यार किया तो डरना क्या?’, मंत्री अब्दुल सत्तार धनंजय मुंडेंच्या मदतीला धावले!

shivsena-abdul-sattar-on-ncp-dhananjay-munde-pyaar-kiya-to-darana-kya-
shivsena-abdul-sattar-on-ncp-dhananjay-munde-pyaar-kiya-to-darana-kya-

जालना: बलात्काराच्या आरोपानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde यांचा भाजपने राजीनाम मागितला आहे. दरम्यान मुंडे यांच्या मदतीला शिवसेना धावून आली आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार Abdul Sattar यांनी ‘प्यार किया तो डरना क्या?’, असं म्हणत धनंजय मुंडे यांची बाजू घेतली आहे.

एकीकडे धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्ष भाजप करत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या गोटातून सावध प्रतिक्रिया येत आहेत. असं असताना एका कार्यक्रमादरम्यान सत्तार यांना याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता ‘प्यार किया तो डरना क्या?’, अशा बिनधास्त शब्दात त्यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.

“धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्व खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडली आहे. तसंच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर मग प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना वापरलेल्या वाक्याची आठवण करुन दिली.

भाजपच्या त्या नेत्यांची नावे मी वेळ आल्यास जाहीर करीन

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनी निवडणूक शपथपत्रात अपत्यांची तसंच लग्नाची माहिती लपवल्याचा आरोप होत आहे. यावर बोलताना सत्तार म्हणाले, “भाजपच्या अनेक नेत्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात विविध प्रकारची माहिती लपवली आहे. त्या नेत्यांची नावे मी वेळ आल्यास जाहीर करीन”.

हेही वाचा : Tesla मोटर्सची भारतात एंट्री, बेंगळुरू शहराची केली निवड 

     

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here