एकनाथ शिंदेंवर आनंद दिघेंच्या कुटुंबाकडून पहिली प्रतिक्रिया; गद्दारांना क्षमा नाही…

shivsena-anand-dighe-kedar-dighe-eknath-shinde-uddhav-thackeray-shivsena-bhavan-news-today
shivsena-anand-dighe-kedar-dighe-eknath-shinde-uddhav-thackeray-shivsena-bhavan-news-today

मुंबई: शिवसेना (ShivSena) नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याने महाराष्ट्रात विविध घडामोडींना वेग आलाय. एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह गुजरातमध्ये गेल्याने सत्तापालटाच्या चर्चांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर शिवसैनिकही आक्रमक झाले आहेत. +“एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेबद्दल खंत आहे. दिघे साहेबांची शिकवण असलेल्या नेत्याकडून असं होणं अपेक्षित नाही. दिघे साहेब असते, तर असं घडलंच नसतं. त्यांनी संघटनेशी गद्दारी सहनच केली नसती. एकनाथ शिंदे १०० टक्के चुकले आहेत,” असं केदार दिघे यांनी सांगितलं.

गद्दारांना क्षमा नाही…

“गद्दारांना क्षमा नाही असं दिघे साहेबांचं ब्रीदवाक्य होतं. शिवसेना कोणत्याही नेत्यामुळे नाही, तर सर्वसामान्य शिवसैनिकांमुळे घडली आहे. त्यामुळे येथे एखादा नेता नाही राहिला, तरी शिवसैनिकांकडे बाळासाहेबांचे, आनंद दिघेंचे विचार, तत्वं आहेत. त्यामुळे शिवसेना यापुढे अधिक जोमाने जाईल,” असं केदार दिघे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.

एकनाथ शिंदेंनी ट्वीटमध्ये आनंद दिघे यांचा उल्लेख केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, “हे ट्वीट करण्याअगोदर मीडियामध्ये त्यांनी ऑफर पाठवल्याची चर्चा होती. भाजपाकडे जाऊन उपमुख्यमंत्रीपद घ्यावं अशी त्यांची मागणी होती.

ही बातमी खरी असेल तर दिघे साहेबांच्या विचाराबाबत कोणी बोलू नये. कारण आपल्या सर्वांना, महाराष्ट्राला आणि भारताला दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी त्यागलं होतं हे माहिती आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते भगव्याप्रतीच निष्ठावंत राहिले. त्यामुळे याचा आधार घेत कोणी आपली भूमिका मांडू नये”.

“मी आनंद दिघे आणि बाळासाहेबांच्या विचाराने प्रभावित होत २०१० मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. २०१६ मध्ये स्थानिक पातळीवरील राजकारणावरुन आणि युवासेनेची घडी नीट बसवल्यानंतर आपल्या मागील तरुणांना योग्य पद मिळावं म्हणून राजीनामा दिला होता. काही पदावर नसलो तरी कायम शिवसैनिक राहीन,” असं यावेळी त्यांनी स्पष्ट केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here