Ram Mandir Scam l राम मंदिर ‘घोटाळ्याचा डाग’ मंदिरावर पडत असेल तर…;शिवसेनेनं केली ‘ही’ मागणी!

Shivsena-demand-clarification-from-pm-modi-on-scam-over-land-in-ram-mandir-temple-in-ayodhya-news-update
Shivsena-demand-clarification-from-pm-modi-on-scam-over-land-in-ram-mandir-temple-in-ayodhya-news-update

मुंबई l ‘राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचं कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल,’ अशी मागणी शिवसेनेनं केली आहे.Shivsena-demand-clarification-from-pm-modi-on-scam-over-land-in-ram-mandir-temple-in-ayodhya-news-update

‘श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट’कडून राम मंदिर उभारण्याचं काम सुरू असतानाच ट्रस्टवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप समोर आले आहेत. या आरोपांवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं पंतप्रधान व सरसंघचालकांना या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली आहे. अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम आणि त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच

‘असंख्य हिंदूंच्या त्यागातून, बलिदानातून, प्रदीर्घ कायदेशीर संघर्षातून सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहत असतानाच एक नवीनच घोटाळा बाहेर आला आहे. या सर्व प्रकरणाची सीबीआय आणि ईडीकडून चौकशीची मागणी समोर आल्याने राममंदिर निर्माणामागे नक्की काय गडबड सुरू आहे, असा संशयाचा धूर निघाला आहे,’ असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

‘रामजन्मभूमी स्थानावर मंदिर निर्माण करावे यासाठी रामलल्लांच्या नावाने अयोध्येत बँक खाते उघडण्यात आले असून त्या खात्यावर जगभरातील कोटय़वधी श्रद्धाळूंनी शेकडो कोटी जमा केले आहेत. अयोध्येत राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री योगी महाराजांच्या हस्ते संपन्न होताच विश्व हिंदू परिषदेचे चार हजारांवर स्वयंसेवक देशभरात घरोघर फिरून सामान्यांकडून राममंदिर निधीसाठी पावत्या फाडत होते. त्यातूनही कोटय़वधी रुपये जमा झाले.

हेही वाचा : VIDEO: तमंचे के दम पर बुजुर्ग मुस्लिम से लगवाया ‘जय श्रीराम’ का नारा, दाढ़ी भी काटी, मारपीट भी की

शिवसेनेनेही एक कोटीचा निधी मंदिर कार्यासाठी दिलाच आहे. त्यामुळे या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे,’ अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here