‘परळ ब्रँड’ शिवसैनिक माजी खासदार मोहन रावले गेले!

Shivsena ex-mp-mohan-rawale-passes-away-in-goa-lalbaug-parel
Shivsena ex-mp-mohan-rawale-passes-away-in-goa-lalbaug-parel

मुंबई l परळ ब्रँड lalbaug-parel शिवसैनिक अशी ओळख असलेले मोहन रावले Mohan rawale यांचे गोव्यात निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून ते दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते. रावले हे गोव्यात असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. passes-away

अत्यंत साधी राहणी असणाऱ्या मोहन रावले यांचा संपर्क दांडगा होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. संजय राऊत यांनी रावले यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली. “मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्हते.

‘परळ ब्रँड’ शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहिला. विनम्र श्रद्धांजली…”, असं ट्विट करत संजय राऊतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

मोहन रावले यांच्या निधनाच्या वृत्तावर प्रतिक्रिया देताना अरविंद सावंत म्हणाले, “मला सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास समजलं की गोव्यात मोहन रावले यांचं निधन झालं. हे ऐकून मला धक्काच बसला. त्यांच्या निवडणुकीचे नामांकन फॉर्म्स असायचे ते मी माझ्या हस्ताक्षरात भरत असे.

मोहन रावले हे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही काळ अंगरक्षक होते. लालबाग परळ भागातील अतिशय लोकप्रिय माणूस अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनाने मी मनस्वी शिवसैनिक आणि मित्र गमावला.”

हेही वाचा l नेपाळमधील हिंदुत्व खतम होत असताना आम्ही काय केले?;शिवसेनेचा पंतप्रधान मोदींना सवाल

मोहन रावले यांची ओळख ‘परळ ब्रँड’ शिवसैनिक अशी होती. ते कडवट शिवसैनिक होते. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात मोहन रावले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here