शिवसेनेची संध्याकाळी पाच वाजता बैठक,गैरहजर आमदारांवर कावाईचा इशारा

thackeray-group-criticizes-chief-minister-shinde-deputy-chief-minister-fadnavis-over-mpsc-students-agitation-news-update
thackeray-group-criticizes-chief-minister-shinde-deputy-chief-minister-fadnavis-over-mpsc-students-agitation-news-update

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आज बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. मात्र, या बैठकीत शिंदे यांच्या बंडावर चकार शब्द काढण्यात आला नसल्याचे समजते. या बैठकीकडे शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी पाठ फिरवली. तर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) व्हर्च्युअल पद्धतीने सहभागी झाले होते. शिवसेनेने संध्याकाळी पाच वाजता बोलावली बैठक आहे. सर्व आमदारांनी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबईत यावे. या बैठकीला उपस्थित न राहिल्यास त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द मानले जाईल, असा इशारा पत्र पाठवून दिला आहे.

 • एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटीत सध्या शिवसेनेच्या 33 आमदारांसह अपक्षासह एकूण 35 आमदार असल्याचे समजते.
 • शिंदे यांना अजून 4 आमदारांचे पाठबळ हवे आहे. त्यापैकी 2 आमदार गुवाहटीत पोहचले आहेत. 2 आमदार मुंबईतून निघालेत.
 • मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर कॅबिनेट बैठक. आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, उदय सामंत, दादा भुसे यांची बैठकीला गैरहजेरी.
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण, नाना पटोलेंची माहिती.
 • महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॅायल स्टोन निवासस्थानी कमनाथ यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसचे बैठक. मात्र, अजूनही आठ आमदार बैठकीला उपस्थित नाहीत.
 • गुवाहतील प्रत्येक बंडखोर आमदारांकडून ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र घेतले.
 • आमदारांची पत्रे राज्यपालांना पाठवणार. व्हीसीद्वारे कोश्यारींसमोर उपस्थित राहणार.
 • आसामचे मुख्यमंत्री हेमंतो बिश्व शर्मा यांच्यावर ऑपरेशन लोटसची जबाबदारी.
 • कमलनाथ काँग्रेस आमदारांच्या बैठकीसाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रॅायल स्टोन निवासस्थानी पोहोचले. थोड्याच वेळात बैठक.
 • राष्ट्रवादीची सिल्वर ओकवरील बैठक संपली
 • शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदारांना मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावले.
 • भाजपच्या आमदारांना अलर्ट.
 • शिवसेनेचे संजय राठोड, योगेश कदम गुवाहटीकडे रवाना.
 • संध्याकाळपर्यंत 50 आमदार ठाकरे सरकारविरोधात जाण्याची शक्यता.
 • राज्यपालांचा चार्ज दुसऱ्या राज्याकडे सोपवला नाही.
 • राजभवनाचे स्पष्टीकरण. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहणार.
 • सकाळी अकरा वाजता काँग्रेसची बैठक.
 • राज्यपाल कोश्यारींना कोरोना.
 • पदभार गोव्याच्या राज्यपालांकडे जाणार का?
 • शिंदे समर्थक आमदारांची गुवाहटीत बैठक.
 • एकनाथ शिंदे यांना नेता म्हणून निवडणार.
 • दुपारी बारा वाजता महाविकास आघाडीची बैठक.
 • राज्यपाल भगतसिंह कोश्यारींना कोरोनाची लागण.
 • काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटायला जाणार.
 • सुरतमध्ये असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे शिवसेनेच्या 35 आमदारांना गुवाहटी (आसाम) येथे नेण्यात येत आहे. तीनही बसेस हॉटेल ‘ली मेरीडीयन’ येथून निघून सुरत विमानतळावर दाखल झाल्‍या आहेत. विमानतळावर भाजपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे बंडखोर आमदारांसोबत दिसले आहेत.
 • आसामचे पाणीपुरवठा मंत्री हॉटेल रॉडिसनमध्ये दाखल
 • रॉडिसन हॉटेलमध्ये बैठकीचे आयोजन
 • आमदारांना सुरक्षा देण्याचे हे राज्य सरकारचे काम – सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते
 • आसामचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता
 • एकनाथ शिंदे यांनी गुहाटीत दाखल झाले असून, आज दुपारी ते विशेष विमानाने मुंबईत येणार आहेत

शिवसेनेचा आमदारांना इशारा

शिवसेनेने संध्याकाळी पाच वाजता वाजता बोलावली बैठक आहे. सर्व आमदारांनी सायंकाळी पाचपर्यंत मुंबईत यावे. या बैठकीला उपस्थित न राहिल्यास त्यांचे पक्षाचे सदस्यत्व रद्द मानले जाईल, असा इशारा पत्र पाठवून दिला आहे.

केंद्रबिंदू आसामकडे

महाराष्ट्राचा राजकीय पेच आता गुजरातमधून आसामकडे सरकणार आहे. शिंदे यांच्यासह 40 बंडखोर आमदार सुरतहून विशेष विमानाने गुवाहाटीत पोहोचले आहेत. सुरत विमानतळावर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडले नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे अशी माझी इच्छा आहे. माझ्यासोबत एकूण 40 आमदार आहेत, त्यापैकी 34 शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आहेत.

देशमुखांना मारहाण

अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी सुरतच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेले होते. काल त्यांच्या पत्नीने पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर महाराष्ट्र पोलिस गुजरातला रवाना झाले आहेत.

बंडखोर आमदारांची यादी

 1. एकनाथ शिंदे – कोपरी

2 अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद

 1. शंभुराज देसाई – पाटण, सातारा
 2. संदिपान भुमरे – पैठण, औरंगाबाद
 3. भरत गोगावले – महाड, रायगड
 4. नितीन देशमुख – बाळापूर, अकोला

7.अनिल बाबर – खानापूर-आटपाडी, सांगली

8.विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम

 1. लता सोनवणे- चाेपडा
 2. संजय गायकवाड – बुलडाणा
 3. संजय रायमूलकर – मेहकर
 4. महेश शिंदे – कोरेगाव, सातारा
 5. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर
 6. प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर

15 संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ

 1. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद
 2. तानाजी सावंत – परंडा, उस्मानाबाद
 3. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
 4. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद
 5. श्रीनिवास वनगा, पालघर
 6. बालाजी कल्याणकर -नांदेड
 7. बालाजी किणीकर- अंबरनाथ
 8. सुहास कांदे -नांदगाव
 9. महेंद्र दळवी- अलिबाग
 10. प्रकाश सुर्वे -मागाठणे
 11. महेंद्र थोरवे -कर्जत
 12. शांताराम मोरे -भिवंडी 28.किशोर पाटील- पाचोरा
 13. चिमणराव पाटील- एरंडोल
 14. प्रदीप जैस्वाल- औरंगाबाद

ठाकरेंच्या संपर्कातील आमदार :

 1. वैभव नाईक
 2. उदयसिंह राजपूत
 3. रवींद्र वायकर
 4. राहुल पाटील
 5. उदय सामंत
 6. प्रकाश फातर्पेकर
 7. सुनील प्रभू
 8. गुलाब पाटील
 9. भास्कर जाधव
 10. संतोष बांगर
 11. आदित्य ठाकरे
 12. राजन साळवी
 13. अजय चौधरी
 14. दिलीप लांडे
 15. सदा सरवणकर
 16. दादा भुसे
 17. संजय पोतनीस
 18. सुनील राऊत

19 कैलास पाटील

 1. दीपक केसरकर

21.यामिनी जाधव

 1. रमेश कोरगावकर
 2. योगेश कदम
 3. मंगेश कुडाळकर

25 प्रताप सरनाईक यापैकी काही आमदार शिंदेंच्या संपर्कात

 शिंदेंची आदित्य ठाकरेंसोबत खडाजंगी

बंडखोरीच्या दोन दिवस आधी म्हणजेच शुक्रवारी मुंबईतील पवई येथील एका हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्यात खडाजंगी झाली होती. यावेळी संजय राऊतही उपस्थित होते. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षासाठी अतिरिक्त मते वापरण्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्याला शिंदे यांनी विरोध केला. शिंदे यांच्या विरोधामुळे काँग्रेसचे एक उमेदवार भाई जगताप यांना आवश्यक असलेली मते मिळाली. मात्र, दुसरे उमेदवार चंद्रकांत हंडोरे निवडून आले नाहीत.

ठाकरेंची शिवसेना डुप्लिकेट

महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी शिवसेनेत सुरू असलेल्या भांडणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ओरिजिनल शिवसेना कोण आणि डुप्लिकेट शिवसेना कोण? यावर शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणती आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणती असा संघर्ष सुरू आहे. शिवसेनेचे बहुतांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे कट्टर शिवसैनिक असल्याचे या आमदारांचे म्हणणे आहे. याशिवाय हे लोक मूळ शिवसेना आहेत. कृपाशंकर सिंह म्हणाले की, सध्या शिवसेनेत कट्टर शिवसैनिक आणि सॉफ्टकोअर शिवसैनिक यांच्यात लढत आहे. सध्या पक्षाचे बहुतांश आमदार आपल्यासोबत असून बहुतांश कार्यकर्तेही सोबत असचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. या तर्काने शिंदे म्हणतात की, ते हिंदुत्वासाठी लढत आहेत आणि म्हणून ते मूळ शिवसेना आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत जायचे आहे.

कंबोज, कुटे बंडखोरांसोबत

भापजचे मुंबईतील उत्‍तर भारतीय नेते मोहित कंबोज हे नुकतेच सुरत विमानतळावर दाखल झाले आहेत. सर्व बंडखोर आमदारांसोबत जपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे दिसले आहेत. त्‍यामुळे या सर्व बंडाळीच्‍या मागे भाजपचा हात असल्‍याचे बोलल्‍या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here