धनंजय मुंडेंचा तो कौटुंबिक प्रश्न,सरकारला कोणताही फरक पडणार नाही : संजय राऊत

shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update
shivsena-press-conference-at-sena-bhavan-today-latest-update-mp-sanjay-raut-talk-on-three-and-half-men-of-bjp-news-update

मुंबई: धनंजय मुंडे Dhananjay munde यांच्यावरील बलात्काराच्या आरोपानंतर Rape allegations विरोधक राजीनाम्याची मागणी करत असताना शिवसेना खासदार संजय राऊत Sanjay raut यांनी संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. हा पूर्णपणे त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sarad pawar योग्य निर्णय घेतील. कौटुंबिक विषयात राजकारण करणं योग्य नसल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

हे आपण धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे. हा पूर्णपणे त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. ते त्यातून मार्ग काढतील. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुजाण आणि प्रगल्भ आहे.

काय निर्णय घ्यावेत आणि काही नाही याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा आहे. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

“महाविकास आघाडीचं सरकार अडचणीत येईल असं वाटत असेल तर तो भ्रम आहे,” असा टोला संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

“राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात.

एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसात करु नये हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवल आहे. शरद पवारांनी सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा : दुसऱ्यांचे खांदे भाडयाने घेऊन शेतकऱ्यांवर बंदुका चालवू नयेत

“केंद्राला शेतकरी आणि शेतकऱ्यांना केंद्र सरकार आडमुठी वाटत आहे. त्यातून प्रश्न कसा सुटणार? शेतकऱ्याने सुप्रीम कोर्टात जाऊन कोणतीच मागणी केलेली नाही.

कायदे रद्द करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. जी समिती स्थापन झाली आहे त्यातील चारही सदस्य कालपर्यंत कृषी कायद्याचे समर्थक होते.

त्यांच्याकडून कोणता न्याय मिळणार ही शेतकऱ्यांची भूमिका आहे. सरकारनं जर एक पाऊल पुढे टाकलं तर आकाश कोसळणार नाही. केंद्र सरकार मजबूत आहे.

त्यामुळे ते कोसळेल किंवा प्रतिमा मलीन होईल असं होणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारने माघार घेऊ नये पण समन्वयाची भूमिका घेतली पाहिजे.,” असा सल्ला संजय राऊत यांनी यावेळी दिला.

हेही वाचा : नवाब मलिक यांच्या जावयाच्या घरावर NCB ची धाड  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here