मोदी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील;संजय राऊतांचा टोला

thackeray-group-shivsena-slams-election-commission-praised-supreme-court-verdict-news-update-today
thackeray-group-shivsena-slams-election-commission-praised-supreme-court-verdict-news-update-today

मुंबई l पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज ७१ वर्षांचे झाले. त्यांचा आज वाढदिवस असल्याने देशभरातले अनेक नेते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. इतर वेळी मोदींवर टीका करणारे शिवसेना खासदार (Shiv-sena MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या असून मोदी यांच्या कामाचं कौतुकही केलं आहे. मात्र, त्यासोबतच त्यांनी मोदींना टोलाही हाणला आहे.

“नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीबद्दल मतभेद असले तरी त्यांच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही अशा शब्दांत त्यांनी मोदी यांचं कौतुक केलं. ते पुढे म्हणाले, आज संध्याकाळी त्यांचा वाढदिवस संपल्यावर ते कोणता केक कापतील हे बघावं लागेल. पण मला खात्री आहे की देशातल्या महागाईसंदर्भातल्या जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन जनतेला बर्थडे गिफ्ट देतील. आमचं लक्ष पंतप्रधान मोदींकडे आहेत”, अशा शब्दांत राऊतांनी मोदींना खोचक टोला लगावला आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी मोदींचं कौतुक करताना म्हणाले, “नरेंद्र मोदी हे देशातले मोठे नेते आहेत. ते आता देशाचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या संघर्षाचा काळ आम्ही जवळून पाहिला आहे. त्यांच्या कार्यकालात देशाला राजकीय स्थैर्य आलं आहे.

हेही वाचा l National Unemployment Day l #राष्ट्रीय_बेरोजगार_दिवस हॅशटॅग चर्चेत; मोदी हे तरुणांना बेरोजगार बनवणारे पंतप्रधान

आत्तापर्यंत आघाडीमध्ये राहून सत्तेवर येणाऱ्या भाजपाकडे एकहाती सत्ता येणे ही मोदींच्या नेतृत्वाची आणि लोकप्रियतेची कमाल आहे हे मान्य केलं पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या तोडीचा दुसरा नेता देशात नाही. त्यांच्या भूमिकेविषयी, कार्याविषयी कितीही वाद असले तरी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना आपण शुभेच्छा द्यायला हव्यात आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रार्थना करतो”.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here