संजय राऊतांचं केसरकरांना प्रत्युत्तर; म्हणाले, “शिंदे गटात टोळी युद्ध सुरू…”

Shivsena-mp- sanjay-raut-mocks-cm-eknath-shinde-on-worli-speech-vacant-chairs-news-update-today
Shivsena-mp- sanjay-raut-mocks-cm-eknath-shinde-on-worli-speech-vacant-chairs-news-update-today

मुंबई: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Ex Cm Uddhav Thackeray) आत्मपरिक्षण केल्यास शिवसेना एकसंध व्हायला वेळ लागणार नाही, असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी चांगलाच समाचार घेतला. दोन्ही गट एकत्र यावेत असं दीपक केसरकरांना वाटत आहे. त्याअर्थी त्यांनी आत्मपरीक्षण केलं आहे. त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांचं हे विधान बाहेर येत आहे. म्हणजेच त्यांच्या गटात अजून काही गट निर्माण झाले आहेत. तिथे टोळी युद्ध सुरू आहे. दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करावं, असे राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलते होते.

 संजय राऊत काय म्हणाले?

“दोन्ही गट एकत्र यावे असं वाटणाऱ्यांनी आधी आत्मपरिक्षण करायला हवं. दीपक केसरकरांनी जे विधान केलं आहे, त्यावरून त्यांच्या गटात आणखी काही गट निर्माण झाले असं दिसतं आहे. अब्दुल सत्तार यांनीही म्हटलंय की माझ्या गटातले लोकं माझा करेक्ट कार्यक्रम करत आहेत. यावरून तुम्ही याचा अर्थ समजून घ्या. त्यांच्या गटात काय वाद सुरू आहेत, हे मी तुम्हाला वारंवार सांगतो आहे”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. हे सरकार जास्त काळ टीकणार नाही, हा गटही टीकणार नाही. यापैकी बरेच लोकं भाजपात प्रवेश करतील. तेच त्यांचे अंतिम ध्येय आहे. कारण त्यांना आता शिवसेना स्वीकारणार नाही, असेही ते म्हणाले.

“दीपक केसरकर यांनी एकत्र येण्याची केलेली भाषा हे त्यांच्या गटातील वैफल्य आहे. मी फ्रेब्रुवारीमध्ये सरकार पडेल, असे बोललो होतो. त्यामुळेच केसरकर आता एकत्र येण्याची भाषा करत आहेत. लवकरच १६ आमदार अपात्र ठरतील. आमची कायदेशीर बाजू भक्कम आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलेल्या भाषणावरूनही त्यांनी टीका केली. विधानसभेत बोलताना महाराष्ट्राच्या विकासावर आणि जनतेच्या मुद्यांवर बोलण्याची संधी मुख्यत्र्यांना मिळत असते. मात्र, मुख्यमंत्री जर विधानसभेत दुखाळा-पाखाळा काढायला लागले. तर राज्याच्या विकासावर कोणी बोलायचं? शिंदेंच विधानसभेतील भाषण हे गल्तीतलं भाषण होतं. मुख्यमंत्री विधानसभेत बोलताना परिस्थितीचे भान ठेऊन बोलावं, असे ते म्हणाले.

  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here