संजय राऊत किरीट सोमय्यांचे नाव घेताच संतापले, म्हणाले “तो माणूस हलकट…”

Shivsena-mp-sanjay-raut-slams-bjp-leader-kirit-somaiya-for-alleging-shiv-sena-leader-anil-parab-news-update-today
Shivsena-mp-sanjay-raut-slams-bjp-leader-kirit-somaiya-for-alleging-shiv-sena-leader-anil-parab-news-update-today

मुंबई: शिवसेना नेते माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे मुंबईतील कार्यालय तोडण्यात आले. या कारवाईनंतर येथे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. याच कारवाईवर तसेच भाजपाचे नेते माजी खा. किरीट सोमय्या (Kirti Somaiya) यांनी केलेल्या आरोपांवर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जात असतील तर आम्ही खरे गुन्हे घ्यायला तयार आहोत. किरीट सोमय्या हलकट माणूस आहे, असे संजय राऊत म्हणाले. ते आज (१ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

मुलूंड येथील एक पोपटलाल वारंवार आरोप करतो

“शिवसेना यापुढे राडा करणार आहे. आमच्यावर खोटे गुन्हे नोंदवले जात असतील तर आम्ही खरे गुन्हे घ्यायला तयार आहोत. अनिल परब यांच्या कार्यालयावर हतोडा टाकण्यात आला. मुळात ते कार्यालय परब यांचे नव्हते, हे म्हाडाने सांगितले आहे. तरीदेखील भाजपाचा मुलूंड येथील एक पोपटलाल वारंवार कधी अनिल परब कधी संजय राऊत कधी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करतो. या बदनामीच्या मोहिमांना आता आम्ही थांबवणार आहोत,” असे संजय राऊत म्हणाले.

 किरीट सोमय्या तसेच नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस दिली

“तुमच्यात हिंमत असेल तर भाजपा पुरस्कृत उद्योगपतीने देशाला खड्ड्यात घातले आहे, यावर बोलावे. हा आर्थिक गैरव्यवहाराचा प्रकार आहे. शेकडो शेल कंपन्यांच्या माध्यमातून देशातील अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यावर पोपटलाल का बोलत नाहीत. काल शिवसेनेने जो राडा केला, त्याचे मी स्वागत करतो. खोट्या कारवाया केल्या जात असतील तर आम्ही कायदेशीर लढाई लढू. मी स्वत: किरीट सोमय्या तसेच नारायण राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यांनी आमच्यावर केलेले आरोप कोर्टात सिद्ध करावे लागतील,” असे आव्हान राऊत यांनी दिले.

 किरीट सोमय्या हलकट माणूस- संजय राऊत

आम्ही लवकरच मुंबई पालिकेचा घोटाळा बाहेर काढू, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे. यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “किरीट सोमय्या हलकट माणूस आहे. अगोदर त्यांनी हिंडेनबर्ग रिसर्चच्या प्रमुखांची भेट घ्यावी. देश आर्थिक संकटात गेला आहे. एलआयसी, गरिबांचे पैसे लुटण्यात आले आहेत. आम्ही तिकिटाचे पैसे देतो, त्यांनी अमेरिकेत जाऊन याची माहिती घ्यावी. हिंमत आहे का? पोपटलालची पोपटपंची आम्ही बंद करू,” असेही संजय राऊत म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here