मुंबई l शिवसेनेच्या ShivSena वतीने अजान azan पठण स्पर्धा आयोजित केली आहे. शिवसेनेचे दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ pandurang-sakpal यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलं आहे. “महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. अशी प्रतिक्रिया पांडुरंग सकपाळ यांनी व्यक्त केली आहे.
मुस्लीम समाजातील लहान मुलांना अजानची गोडी लागावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचं पांडुरंग सकपाळ यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी अजानला विरोध करणंही चुकीचं असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान ही स्पर्धा आयोजित करण्यावरुन भाजपाने शिवसेनेवर टीका केली आहे.
पांडुरंग सकपाळ यांनी म्हटलं आहे की, “अजान एका धर्माची भावना आहे. अजानमध्ये खूप गोडवा आहे, त्यामुळे मनला शांती मिळते. मी बडा कब्रस्तानच्या शेजारी राहतो. त्यामुळे माझ्या कानावर रोजच अजान पडते.
पाच मिनिटाच्या अजानमुळे कुणाला त्रास होत असेल तर ही गोष्ट मिठाच्या खड्यासारखी समजून त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे”.“अजान देणाऱ्या मुलांचे उच्चार, त्यांचा आवाज आणि पाठांतर पाहून त्यांना बक्षिस दिलं जाईल.
यासाठी मौलाना परीक्षकाचे काम पाहतील. स्पर्धेचा सर्व खर्च शिवसेना करणार आहे,” अशी माहिती पांडुरंग सकपाळ यांनी दिली आहे. “महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व आहे. प्रेम आणि शांतीचं ते प्रतिक आहे. त्यावर वाद घालणं उचित वाटत नाही,”
असंही ते म्हणाले आहेत.
हेही वाचा l बाबा आमटेंच्या नात डॉक्टर शीतल आमटे यांची आत्महत्या, ‘हा’शेवटचा ट्विट
[…] महाआरतीप्रमाणेच अजानचं महत्त्व; शिवस… […]