छोट्याशा मुलीने शेवटी करुन दाखवलं, पाहा व्हिडीओ

small-girl-climbing-up-on-pillar-video-goes-viral-on-social-media-news-update
small-girl-climbing-up-on-pillar-video-goes-viral-on-social-media-news-update

सोशल मीडियावर एका छोट्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या सात वर्षांच्या मुलीचा व्हिडीओ पाहून एका आयएएस अधिकाऱ्याने तिला थेट गुरु मानले आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा होतेय.Small girl climbing up on pillar video goes viral on social media

पाहा व्हिडीओमध्ये काय आहे ?

व्हिडीओमध्ये एक छोटी मुलगी भिंतीला लागून असलेल्या एका पिलरवर चढण्याचा प्रयत्न करत आहे. या पिलरवर चढण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. असे असूनदेखील ही छोटी मुलगी त्या पिलरवर चढत आहे. ती थोडे वर गेल्यानंतर पुन्हा खाली कोसळते आहे. पडल्यानंतर ती पुन्हा एकदा हिम्मत न हारता पिलरवर चढण्याचा प्रयत्न करत आहे.

…आणि मुलगी शेवटी यशस्वी झाली

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी पिलवर चढतेय. पिलवर चढताना ती अनेकवेळा खाली कोसळत आहे. एकदा, दोनदा पडल्यानंतरसुद्धा ती निश्चय ढळू देत नाहीये. शेवटी अथक प्रयत्न आणि परिश्रमाच्या जोरावर मुलगी पिलरवर यशस्वीपणे चढल्याचे दिसतेय. मुलगी आपल्या प्रयत्नांमध्ये शेवटी यशस्वी झाली आहे.

आयएएस अधिकाऱी म्हणाले ही लहान मुलगी माझी गुरु

या छोट्या मुलीच्या करामतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या मुलीकडे पाहून प्रेरणा घ्यावी असे अनेकांनी म्हटलेय. हा व्हिडीओ आयएएस अधिकारी डॉ. एम. व्ही. राव Dr. M V Rao, IAS यांनी पाहिला. त्यांनी लगेच हा व्हिडीओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. तसेच ही लहान मुलगी माझी गुरु आहे, असे कॅप्शनसुद्धा दिले. या लहान मुलीकडून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, असे त्यांना सुचवायचे असावे.

पाहा व्हिडीओ

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या मुलीचे कौतूक केले आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहे. लोकांनी या लहान मुलीच्या निश्चयाकडे पाहून तिचे कौतूकसुद्धा केले आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 2500 पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here