सापांचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे. जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात एक अजगर साप थेट एका कपड्याच्या दुकानात लपून बसला होता.
उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका कपड्याच्या दुकानात साप दिसल्यानंतर एकच गोंधळ उडाला. मात्र एवढा मोठा अजगर दुकानात कसा आला? असा सवाल सगळे करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लालकुर्ती पोलीस स्टेशन हद्दीतील बेगमपुल येथील पेंठ येथील रामा सूटच्या दुकानात कपड्यांवर एक अजगर येताना दिसला.
हा प्रकार पाहताच त्यांनी आरडाओरड करत तेथून पळ काढला. माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अथक परिश्रमानंतर टीमने अजगराला सुखरूप पकडले. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे.
#उत्तर_प्रदेश #मेरठ: दुकान में विशालकाय अजगर निकला..!!
अजगर देख बाजार में मची अफरा-तफरी..!!वन विभाग की टीम ने अजगर को पकड़ा..!!
मेरठ के लालकुर्ती पैठ बाजार का मामला..!! #ViralVideo pic.twitter.com/SwSLAwSpOt
— MANOJ SHARMA LUCKNOW UP🇮🇳🇮🇳🇮🇳 (@ManojSh28986262) December 5, 2023
वननिरीक्षक मोहन सिंग यांनी दिली माहिती
वननिरीक्षक मोहन सिंग यांनी सांगितले की, सुटका करण्यात आलेल्या अजगराची लांबी सुमारे १२ ते १४ फूट होती. जवळच अबू नाला असल्याने तेथून अजगर येण्याची शक्यता आहे. अजगराची सुटका करून जंगलात सोडण्यात आले आहे.