महिलेने एकाच वेळी दिला १० मुलांना जन्म!

south-african-woman-claims-she-gave-birth-to-10-babies-at-once-set-new-world-record-news-update
south-african-woman-claims-she-gave-birth-to-10-babies-at-once-set-new-world-record-news-update

दरबन: दक्षिण आफ्रिकेत एका महिलेने १० मुलांना जन्म दिला आहे. डॉक्टरांनी अधिकृतपणे याला दुजोरा दिल्यास हा एक विक्रम असणार आहे. एक महिन्यापूर्वीच माली देशातील महिलेने मोरक्कोमध्ये ९ मुलांना जन्म दिला होता. दक्षिण आफ्रिकेतील महिला गोसिअमे थमारा सितोले (वय ३७) या महिलेने १० मुलांना जन्म दिला आहे. यामध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. South-african-woman-claims-she-gave-birth-to-10-babies-at-once-set-new-world-record-news-update

सितोलेचे पती टेबोगो त्सोत्सीने सांगितले की, ७ जून रोजी प्रिटोरियन रुग्णालयात सिजेरियन शस्त्रक्रियेने प्रसुती झाली. डॉक्टरांनी गरोदरपणाच्यावेळी केलेल्या तपासणीत सहा मुले असल्याचे टेबोगो यांना सांगितले होते. त्यानंतर आठ मुले असल्याचे सांगितले. मात्र, प्रसुतीवेळी १० मुलांचा जन्म झाला. या आफ्रिकन जोडप्याला याआधीच जुळे मुले आहेत. टेबोगो त्सोतेत्सी सध्या बेरोजगार आहेत. टेबोगो यांनी सांगितले की, मुलांच्या जन्मानंतर मी भावूक झालो असून आनंदी आहे.

याआधी आफ्रिकन देश मालीमधील एका महिलेने ९ बाळांना जन्म दिला होता. प्रसुतीनंतर आई आणि नवजात बालके सुखरूप असल्याची माहिती माली सरकारने दिली. माली सरकारने २५ वर्षीय हलीमाला चांगले उपचार मिळावे व सुखरूप प्रसुती व्हावी यासाठी मोरक्को येथे पाठवले होते. या महिलेच्या गर्भात सात भ्रुण असल्याचे वैद्यकीय चाचणीत म्हटले गेले होते. मात्र, तिने ९ बाळांना जन्म दिला.

हेही वाचा : ‘’…म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिल्ली गाठली आणि मोदींनाच सांगितले’’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here