Vidhan Sabha अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील! शरद पवारांनी काढली भास्कर जाधवांची हवा

speaker-of-assembly-will-be-from-congress-ncp-chief-sharad-pawar-denied-changes-in-any-equations-news-update
speaker-of-assembly-will-be-from-congress-ncp-chief-sharad-pawar-denied-changes-in-any-equations-news-update

बारामती l विधीमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन गाजवणाऱ्या तालिका अध्यक्ष शिवसेना आमदार भास्कर जाधवांच्या Bhaskar Jadhav स्वप्नांना आता शरद पवारांनीही Sharad Pawar सुरुंग लावला आहे. नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त असलेलं अध्यक्षपद हे शिवसनेकडे ShivSena घेऊन काँग्रेसला Congress वनमंत्रीपद द्यावं अशी चर्चा सुरु असल्याचं भास्कर जाधवांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. परंतू शरद पवारांनी या शक्यता फेटाळून लावत अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहील असं स्पष्ट केलंय.

“आम्हा तिन्ही पक्षांचा स्वच्छ निर्णय झालेला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडेच राहील. त्यामुळे कुणीही काही बोलायचा संबंध येत नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे आणि आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत”, असं म्हणत पवारांनी एका अर्थाने भास्कर जाधवांची दावेदारी निकालात काढली आहे. पवार बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान काँग्रेसनेही अध्यक्षपदावर आपला दावा कायम असल्याचं स्पष्ट केलं आहे. “विधीमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडलं. तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधवांनी चांगली कामगिरी पार पाडली. पण हे पद शिवसेनेला देण्य़ाचा कोणताही विचार किंवा चर्चा झालेली नाही. आमच्याकडेही अनेक भास्कर जाधव आहेत”, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी अध्यक्षपदावर काँग्रेसचा दावा कायम असल्याचं सांगितलं.

“आमच्या पक्षात सक्षमपणे काम करु शकणारे नेते आहेत. शिवाय सत्ता वाटपात विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे आलेलं आहे. आता याच्यामध्ये बदल करण्यासंबंधी आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झालेली नाही. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवड होऊ शकलेली नाही. यासाठी बरीच मोठी प्रक्रिया आहे. कोरोनाचं वातावरण निवळल्यानंतर ही निवडणूक घ्यावी लागणार आहे”, असंही थोरात म्हणाले.

हेही वाचा

Father Stan Swamy l स्टॅन स्वामींची तर तुरुंगात हत्याच झाली; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here