SSC HSC Supplementary Exam 2021 l दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखा अखेर जाहीर

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

mistakes-in-12th-std-board-english-paper-instead-of-question-paper-model-answer-paper-printed-news-update
mistakes-in-12th-std-board-english-paper-instead-of-question-paper-model-answer-paper-printed-news-update

मुंबई l शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड Varsha Gaikwad यांनी दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांच्या तारखांसदर्भात SSC- HSC Supplementary Exam 2021  महत्वाची घोषणा केली आहे. कोरोना विषाणू ससंर्गामुळं महाराष्ट्र सरकारनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. पर्यायी मूल्यांकन धोरणानुसार बोर्डानं निकाल जाहीर केले होते. या निकालामध्ये उत्तीर्ण न झालेले विद्यार्थी आणि ए.टी.के.टीशाठी पात्र विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-ऑक्टोंबर महिन्यात घेण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं यांसदर्भातील तारखा जाहीर केल्या आहेत.

या तारखेला दहावीची परीक्षा?

बोर्डानं जारी केलेल्या परिपत्रकानुसार माध्यमिक शालान्त परीक्षा म्हणजेच दहावीची परीक्षा बुधवारी 22 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी यासंदर्भात त्यांच्या शाळेशी संपर्क साधून आवश्यक माहिती घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

बारावीची परीक्षा कधी?

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीच्या सर्वसाधारण अभ्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत पार पडेल. या शिवाय बारावीच्या व्यवसाय अब्यासक्रमांची परीक्षा 16 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येईल, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

प्रात्याक्षिक परीक्षा कधी घेतली जाणार?

इयत्ता दहावीची प्रात्याक्षिक आणि तोंडी, श्रेणी परीक्षा 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेतली जाईल. दुसरीकडे बारावीची प्रात्याक्षिक, श्रेणी आणि तोंडी परीक्षा 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान घेतली जाईल.

सविस्तर वेळापत्रक कुठं पाहायचं?

दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षांचं वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. वेबसाईटवर उपलब्ध असलेलं वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी असून महाविद्यालय आणि शाळांकडे देण्यात येणार वेळापत्रक अंतिम असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here