ST : लालपरीला १०० टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी

Hey surprise: 1100 drivers in ST department, only 6 machines for alcohol consumption check!
Hey surprise: 1100 drivers in ST department, only 6 machines for alcohol consumption check!

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाला मोठा फटका बसला होता. आता राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याआधी २० जुलैला फिजिकल डिस्टन्सिंग पाळत आसन क्षमतेच्या ५० टक्के आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. राज्यात आता अटी-शर्थींसह १०० टक्के प्रवासी वाहतूक परवानगी देण्यात आली आहे.

बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरु असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नव्हती. मात्र आता राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अटी-शर्थींसह ही परवानगी देण्यात आली आहे.

या आहेत अटी

 बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायजर लावणं बंधनकारक

वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करुनच मार्गस्थ करण्यात याव्यात

लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेससाठी एका आसनावर एक प्रवाशी अशा तिरप्या (Z) पद्धतीने आरक्षण उपलब्ध आहे. तथापी पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक सुरु होत असल्याने सर्व आसने पूर्वीप्रणाणे आरक्षणासाठी उपलब्ध करुन द्यावीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here