भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांचा स्वपक्षालाच अल्टीमेटम…

भाजपा आयटी सेल विरुध्द भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी वाद

Subramaniam swamy-attack -it-cell-chief-amit malviya - ultimatum-to-bjp –jp nadda
Subramaniam swamy-attack -it-cell-chief-amit malviya - ultimatum-to-bjp –jp nadda

मुंबई : भाजपाचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाच्या आयटी सेलविरोधात कारवाईसाठी भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना प्रस्ताव दिला आहे. स्वामी मागील काही दिवसांपासून भाजपाच्या आयटी सेलविरोधात आक्रमक झाले असून, त्यासंदर्भातच कारवाई करण्यासाठी उद्यापर्यंतची वेळ दिली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांच्यात वाद सुरु आहे. आपल्याला बनावट आयडीवरून ट्रोल केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर स्वामी यांनी आज पुन्हा एक ट्विट केलं आहे, ज्यात मालवीय यांच्यावरील कारवाईसाठी भाजपाला अल्टीमेटम दिला आहे.

…तर त्याचा अर्थ असा होईल की

“भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांना मालवीय यांना हटवण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे. जर उद्यापर्यंत मालवीय यांना आयटी सेलमधून हटवण्यात आलं नाही. तर त्याचा अर्थ असा होईल की, पक्ष माझा बचाव करू इच्छित नाही. पक्षात असा कोणताही मंच नाही, जिथे मी मत विचारू शकेल, त्यामुळे मला स्वतःलाच माझा बचाव करावा लागेल,” असं स्वामी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here