बॉलिवूडमधील प्रसिद्ध फॅशन डिझायनर स्वप्निल शिंदेनेेे Swapnil shinde सोशल मीडिया पोस्टद्वारे ट्रान्सवुमन सायशा Saisha झाल्याचा खुलासा केला. त्याच्या या निर्णयाचे बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण, करीना कपूर खान, कियारा अडवाणी, श्रद्धा कपूर, कतरिना कैफ, अनुष्का शर्मा यांनी स्वागत केले होते. आता अभिनेत्री सनी लिओनीने Sunny leone सायशाला काही भेटवस्तू पाठवत शुभेच्छा दिल्या आहेत.
सायशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला सनी लिओनीने पाठवलेल्या भेटवस्तूंचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये सनीने सायशाला मेकअपचे सामान पाठवले असल्याचे दिसत आहे. त्यासोबतच सनीने एक नोट देखील लिहून पाठवली आहे.


‘सायशा, तू जो निर्णय घेतलास तो घेणे सोपे नाही. तू खूप धाडसी आहेस आणि तुला जे हवे आहे ते करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहेस.
आता तू एक धाडसी, प्रेमळ आणि स्वतंत्र्य ट्रान्सवुमन आहेस. मी कायम तुझ्यासोबत आहे’ या आशायची नोट सनीने सायशाला पाठवली आहे.
सायशाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने ‘शाळा आणि कॉलेजमध्ये जेव्हा सगळी मुले माझ्या वागण्यावरून टीका करत होते तेव्हा माझ्या मनावर खूप वार झाले. जे अस्तित्व माझं नाही ते जगताना मला गुदमरल्यासारखं होत होतं.
View this post on Instagram
वयाच्या विसाव्या वर्षी NIFT दरम्यान मी माझं सत्य स्वीकारण्याचं धाडस केलं आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मी मुक्त झाले. पुरुषांकडे आकर्षित होत असल्याने मी समलैंगिक आहे असं सुरुवातीला मला वाटलं.
पण सहा वर्षांपूर्वी मी स्वत: पूर्णपणे स्वीकारलं आणि आता मी समलैंगिक नाही तर ट्रान्सवुमन आहे’, असे सायशाने लिहिले होते.























































































































































































