Pathaan movie 2023: शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या…

Ncp-mp-supriya-sule-on-shahrukh-khan-and-deepika-padukone-pathaan-movie-says-he-is-the-superstar-of-india-see-details-news-update
Ncp-mp-supriya-sule-on-shahrukh-khan-and-deepika-padukone-pathaan-movie-says-he-is-the-superstar-of-india-see-details-news-update

मुंबई : शाहरुख खान Shahrukh khan व दीपिका पदुकोणच्या Deepika padukone ‘पठाण’ चित्रपट (Pathaan Movie) जगभर सुपरडूपर ठरला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. जगभरात आतापर्यंत ‘पठाण’ने ३१३ कोटी रुपये कमावले आहेत. पण चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘पठाण’ वरुन बराच वाद रंगला होता. दीपिकाची ‘बेशरम रंग’ गाण्यामधील भगवी बिकिनी तर वादाचा विषय ठरली. सध्या ‘पठाण’चं सर्वत्र कौतुक होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी या चित्रपटाबाबत भाष्य केलं आहे.

‘Unfiltered By Samdish’ या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी ‘पठाण’ चित्रपट तसेच शाहरुख व दीपिकाबाबत भाष्य केलं. सुप्रिया सुळे म्हणाल्या, “शाहरुख खान भारताचा सुपरस्टार आहे. तो त्या चित्रपटात (पठाण) अगदी चांगला दिसत आहे. तो व दीपिका एकत्र अगदी छान दिसत आहेत. मला असं वाटतं काही लोक शाहरुख खानवर जळतात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

 मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रासारख्या राजकारण्यांनी ‘पठाण’ला केलेल्या विरोधाचं तुम्ही समर्थन करता का? असं सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं. यावेळी त्या म्हणाल्या, “अजिबात नाही. मी या गोष्टींना पाठिंबा देत नाही. मी अशावेळी त्या व्यक्तींना फोन करेन. त्यांना विचारेन की, भाऊ तुला काय झालं आहे?”

 पुढे त्या म्हणाल्या, “आपण अशा विषयांवर चर्चा का करतो? अरुण जेटली म्हणायचे, तुम्ही दाखवणं बंद केलं तर लोक बोलणं बंद करतील. कधी कधी मला अरुणजी यांचं हे वाक्य पटतं.” शाहरुख व दीपिकाचा हा चित्रपट सुप्रिया सुळे यांच्याही पसंतीस पडला आहे. पठाण आज सुट्टीच्या दिवशी किती कमाई करतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here