Sushant Singh Case: संदीप सिंह मोदींच्या बायोपिकचे निर्माते, काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल!

संदीप सिंह यांची चौकशी आणि भाजप अँगल तपासणी करा- सचिन सावंत

sushant-singh-case-congress-leader-sachin-sawant-tweeted-sandeep-singh bjp angle
sushant-singh-case-congress-leader-sachin-sawant-tweeted-sandeep-singh bjp angle

मुंबई : ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा निर्माता असलेल्या संदीप सिंहचे नाव सुशांतसिंह राजपूत प्रकरणात पुढं आल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे. संदीप सिंह याच्यासाठीच या प्रकरणाचा तपास सीबीआय व ईडीकडे दिला का, असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते सरचिटणीस सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

संदीप सिंह याची सुशांतशी चांगली मैत्री होती. या प्रकरणात आता त्याचंही नाव येऊ लागलं आहे. तो देशाबाहेर पळण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी सीबीआय संदीपची चौकशी करणार असल्याचीही बातमी आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती आहे, भाजप अँगल तपासून घ्यावा. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज नेक्ससमध्ये सीबीआय संदीप सिंह यांची चौकशी करणार आहे. संदीप सिंह हे ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ या बायोपिकचे निर्माते आहेत, ज्या सिनेमाचे पोस्टर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस जी यांनी लाँच केले होते.” असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.

भाजप नेते राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून बॉलिवूडशी ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्याची विनंती केली होती. त्या ट्वीटला उत्तर देत सावंत यांनी संदीप सिंह यांच्याविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत.

सचिन सावंत यांनी विचारलेले प्रश्न

1. फडणवीस सरकार असताना चौकशीचा आदेश का नाही?

2. सीबीआय आणि ईडीला घाईघाईने आणण्याचे कारण संदीप सिंह होते का?

3. भाजपचे सर्वोच्च नेते बॉलिवूडच्या अगदी जवळून संपर्कात असल्याने त्यांची ड्रग्जच्या व्यवहाराला फूस होती का?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here