Ramdas Kadam: “रामदास कदम हे झंडू बाम लावून रडतात, असा रडका वाघ…”, सुषमा अंधारेंची खोचक टीका!

sushma-andhare-criticized-ramdas-kadam-in-nanded-speech-during-mahaprabodhan-yatra-news-update
sushma-andhare-criticized-ramdas-kadam-in-nanded-speech-during-mahaprabodhan-yatra-news-update

नांदेड: उद्धव ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray Group) महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने रविवारी नांदेडच्या मुखेड येथे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच यावेळी राजकीय टोलेबाजीदेखील बघायला मिळाली.

उद्धव ठाकरे गटाकडून महाराष्ट्रभर महाप्रबोधन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेच्या निमित्ताने रविवारी नांदेडच्या मुखेड येथे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीकास्र सोडलं. तसेच यावेळी राजकीय टोलेबाजीदेखील बघायला मिळाली.

 एकनाथ शिंदेंना लगावला टोला

दरम्यान, ‘मी गद्दार नाही, खुद्दार आहे’ असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेडमधील सभेत बोलताना केले होते. यावरूनही सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. “एकनाथ शिंदेंनी असं म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे. गेल्या १० वर्षांत हा अत्यंत सुंदर आणि चांगल्या दर्जाचा विनोद आहे”, असा टोला त्यांनी लगावला. तसेच “एकनाथभाऊ डायलॉग खूप मारतात. पण त्यांचा स्क्रिप्टरायटर त्यांनी बदलायची गरज आहे”, असेही त्या म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here