swami agnivesh : माजी शिक्षणमंत्री स्वामी अग्निवेश यांचे निधन

swami-agnivesh-passes-away-80-was-suffering-multiple-organ-failure
swami-agnivesh-passes-away-80-was-suffering-multiple-organ-failure

नवी दिल्ली : जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, हरियाणाचे माजी शिक्षणमंत्री स्वामी अग्निवेश यांचे आज शुक्रवारी निधन झाले. दिल्ली येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्र्वास घेतला. सोमवारी स्वामी अग्निवेश यांना नवी दिल्लीतील लिव्हर अँड बायिलरी सायन्सेस (ILBS) मध्ये दाखल करण्यात आले होते. (swami agnivesh dies after suffering multiple organ failure)

स्वामी अग्निवेश यांना शुक्रवारी हृदयाचा झटका आला. अशी माहिती आयएलबीएसकडून देण्यात आली. स्वामी अग्निवेश यांना यकृतासंबंधी त्रास होता. मंगळवारपासून त्यांच्या शरिरातील प्रमुख अवयवांनी कार्य करणे बंद केले होते. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

स्वामी अग्निवेश यांनी १९७० मध्ये आर्य सभा नावाचा पक्ष स्थापन केला होता. १९७७ मध्ये हरियाणाचे शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. स्वामी अग्निवेश २०११ मध्ये लोकपालसाठी अण्णा हजारे यांच्या आंदोलनातही सहभागी झाले होते. काही मतभेद झाल्याने ते या आंदोलनातून दूर झाले होते. स्वामी अग्निवेश हे बिग बॉसमध्येही सहभागी झाले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. सामाजिक मुद्द्यांवर ते कायम भाष्य करत असत. १९८१ मध्ये त्यांनी बंधुता मुक्ती मोर्चा नावाच्या संघटनेची स्थापनाही केली होती. स्वामी अग्निवेश यांचे वकिली आणि बिजनेस मॅनेजमेंटमध्ये शिक्षण झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here