swami chaitanyananda sex scandal : मुलींच्या हॉस्टेलमध्ये सीक्रेट कॅमेरा, रात्री बेडरुममध्ये बोलावून… स्वामी चैतन्यानंदची ‘लेडी गँग’

चैतन्यानंद सरस्वती बाबाने ज्या प्रकारे मुलींचे लैंगिक शोषण केले ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. आता नेमंक हे रॉकेट कसे चालवले जायचे सविस्तर घेऊया...

swami-chaitanyananda-sex-scandal-secret-cameras-in-hostel-news-update-today
swami-chaitanyananda-sex-scandal-secret-cameras-in-hostel-news-update-today

दिल्ली: दिल्लीत एका बाबाच्या कांडाने खळबळ उडाली आहे. दक्षिण दिल्लीतील एका शिक्षण संस्थेशी संबंधित स्वामी चैतन्यानंद सरस्वती swami chaitanyananda sex scandal यांच्यावर विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. स्वतःला आध्यात्मिक गुरू म्हणवणारा हा बाबा चैतन्यानंद सरस्वती मोठा कांड करणारा आहे. त्याने अनेक मुलींचे लैंगिक शोषण केले आहे. तो रात्रीच्या वेळी आपल्या खाजगी कक्षात मुलींना बोलावत असे आणि परदेश दौऱ्यासाठी जबरदस्ती करत असे. एवढेच नव्हे, त्याने सुरक्षेच्या नावाखाली मुलींच्या वसतिगृहात गुप्त कॅमेरे लावले होते. एफआयआरमध्ये चैतन्यानंद सरस्वतीच्या काळ्या कृत्यांची नोंद झाली आहे. 

विद्यार्थिनींची छेड काढण्याच्या प्रकरणात चैतन्यानंद सरस्वतीबाबत मोठा खुलासा झाला आहे. एफआयआरनुसार, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील (EWS) विद्यार्थिनींना रात्री उशिरा कथित स्वामी चैतन्यानंद सरस्वतीच्या क्वार्टरमध्ये बोलावले जात असे. मुलींच्या वसतिगृहात सुरक्षेच्या नावाखाली गुप्त कॅमेरे लावण्यात आले होते. एका विद्यार्थिनीचे नाव तिच्या इच्छेविरुद्ध बदलण्यास भाग पाडले गेले. एवढेच नव्हे, विद्यार्थिनींना परदेश दौरे आणि रात्री उशिरा चैतन्यानंद सरस्वतीच्या खाजगी कक्षात बोलावण्यासाठी जबरदस्ती केली जात असे.

चैतन्यानंद सरस्वतीसोबत सर्व कसे सामील आहेत?

एफआयआरनुसार, सहाय्यक डीनसह काही कर्मचारी सदस्य विद्यार्थिनींवर स्वामीच्या लैंगिक मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव टाकत होते. तसेच, विद्यार्थिनींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात होते. ज्या मुली विरोध करत, त्यांना धमकावून गप्प बसवले जाई. विरोध करणाऱ्या विद्यार्थिनींना निलंबित करण्याची आणि कॉलेजमधून काढून टाकण्याची धमकी दिली जात होती. विद्यार्थिनींच्या पालकांना हस्तक्षेप करण्यापासून रोखले जात होते.

पदवीची धमकी आणि विद्यार्थिनींमध्ये भीती

तक्रारीमध्ये पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, स्वामी चैतन्यानंद सरस्वती आणि त्याच्या काही सहकाऱ्यांकडून महिला विद्यार्थिनींचे लैंगिक आणि मानसिक शोषण केले गेले. व्हॉट्सअॅप आणि एसएमएसद्वारे विद्यार्थिनींना अश्लील तसेच आक्षेपार्ह संदेश पाठवले जात होते. संदेशांचा किंवा लैंगिक मागण्यांचा विरोध केल्यास विद्यार्थिनींना कॉलेजमधील पदवी अडकवून ठेवण्यास आणि कागदपत्रे न देण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. महिला विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणात विद्यार्थिनी वैयक्तिकरित्या समोर येण्यास घाबरतात आणि त्यांना त्यांच्या जीवाला धोका वाटत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here