Swara Bhasker : “फिल्मी सुहाग रात…” स्वरा भास्करने शेअर केलेला मधुचंद्राच्या रात्रीचा खास फोटो चर्चेत

swara-bhasker-shares-photo-of-her-first-night-as-filmy-suhaag-raat-gets-viral-on-social-media-news
swara-bhasker-shares-photo-of-her-first-night-as-filmy-suhaag-raat-gets-viral-on-social-media-news

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर Swara Bhasker गेले काही दिवस चांगलीच चर्चेत होती. समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी स्वराने लग्न केल्याची बातमी नुकतीच समोर आली होती. याआधीच स्वराने कोर्टात जाऊन फहादशी लग्न केल्याचंही स्पष्ट झालं. त्यानंतर हा फक्त साखरपुडा आहे, अजून रीतसर रितीरिवाजानुसार लग्न होणार असल्याचंही स्वराने स्पष्ट केलं होतं, पण स्वराने गुपचुप जाहीर केलेल्या या लग्नाच्या बातमीची जोरदार चर्चा झाली. काहींनी तिला सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिला चांगलंच ट्रोल केलं.

यानंतर स्वराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून आणखी एक फोटो शेअर करत लोकांना सरप्राइज दिलं होतं. लग्नानंतरच्या पहिल्या म्हणजेच मधुचंद्राच्या रात्रीच्या दिवशी बेडरूममधील सजावटीचा एक फोटो शेअर केला होता. आता तिच्या अकाऊंटवरुन हा फोटो डिलीट करण्यात आला असला तरी सोशल मिडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये स्वराने तिच्या बेडरूममध्ये फुलांनी सजवलेला बेड आपल्याला दिसत आहे, याबरोबरच तिने तिच्या आईसाठी या फोटोमध्ये खास मेसेज दिला आहे. या फोटोबरोबर स्वरा लिहिते, “माझी मधुचंद्राची रात्र एकदम फिल्मी असावी यासाठी आईने पूर्ण तयारी केली आहे.” स्वराच्या लग्नानंतरच्या पहिल्या रात्री तिची बेडरूम सजवण्याची जबाबदारी होम डेकोर स्टाइलिस्ट प्रियंका यादवकडे देण्यात आली होती.

प्रियंकानेसुद्धा स्वराने शेअर केलेला हा फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला होता. ६ जानेवारीलाच स्वराने कोर्टात जाऊन लग्नाची शपथ घेतली होती. १६ फेब्रुवारीला स्वरा आणि फहादने त्यांच्या लग्नाबद्दल जाहीर केलं आणि त्यादरम्यानचे फोटोज शेअर करत चाहत्यांना सरप्राइज दिलं. फहाद अहमद हा समाजवादी पार्टीची युवा संघटनेचा मुंबई आणि महाराष्ट्र भागातील अध्यक्ष आहे. असं म्हंटलं जातं की सीएए विरोधात काढलेल्या मोर्चादरम्यानच स्वरा आणि फहादची ओळख झाली होती आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here