ताजमहाल-आग्रा किल्ल्यात पर्यटकांना उद्या पासून प्रवेश, पण ‘ही’ अट

taj-mahal-and-agra-red-fort-reopen-from-21-september
ताजमहाल- आग्रा किल्ला उद्यापासन खुले होणार taj-mahal-and-agra-red-fort-reopen-from-21-september

नवी दिल्ली : ताजमहाल आणि आग्रा किल्ला पर्यटकांसाठी सोमवारपासून खुले केले जाणार आहेत. दोन्ही ऐतिहासिक स्थळे 17 मार्चपासून बंद होते. परंतु, ताजमहालमध्ये एका दिवसात कमला 5 हजार आणि आग्रा किल्ल्यात 2500 पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे.

आग्रा मधील दोन ऐतिहासिक स्थळे उद्यापासून पुन्हा उघडली जातील. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ही दोन्ही स्थळे पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था केली आहे. यावेळी, कोविड – 19 च्या गाइडलाइनचे पालन करावे लागेल.

फक्त 5 हजार पर्यटकांना एका दिवसात प्रवेश

ताजमहालमध्ये एका दिवसात कमला 5 हजार आणि आग्रा किल्ल्यात 2500 पर्यटकांना प्रवेश मिळणार आहे. दोन्ही स्मारकांची तिकीट खिडकी बंद राहील. प्रवेशासाठी ऑनलाइन तिकीट खरेदी करावे लागेल. क्यूआर कोड स्कॅन करून देखील तिकीट घेता येईल. या स्मारकांमध्ये स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (एसओपी)चे अनुसरण करण्याचे निश्चित केले जाईल. सीआयएसएफ पर्यटकांची तपासणी करेल. ताजमहालमधील शाहजहां आणि मुमताज यांच्या कबर पर्यटकांना पाहता येईल. मात्र मकबऱ्यात एकावेळी फक्त पाच पर्यटकांना जाता येईल.

या गोष्टींचे करावे लागणार पालन

पर्यटकांना मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागले.

तिकीट खिडकी बंद राहतील. ऑनलाइन तिकीटावर प्रवेश मिळेल.

पार्किंगसह सर्व पेमेंट डिजिटली करावे लागेल.

भिंती आणि रेलिंगपासून दूर रहावे लागेल.

प्रवेशापूर्वी थर्मल स्क्रीनिंग होईल. लक्षणे नसणाऱ्यांना प्रवेश दिला जाईल.

स्मारकात ग्रुप फोटोग्राफीला परवानगी मिळणार नाही.

प्रवेश तिकिटासाठी परदेशी पर्यटकांना 1100 रुपये आणि देशातील पर्यटकांना 50 रुपये मोजावे लागतील.

इतिहासकारांच्या मते, ताजमहालची निर्मिती 1632 ते 1648 दरम्यान झाली. आतापर्यंत तीनवेळा ताज बंद करण्यात आले. पहिल्यांदा 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ताजमहाल 15 दिवस बंद होते. 1978 मध्ये पूरामुळे 7 दिवसांसाठी आणि यानंतर कोरोना व्हायरसमुळे 17 मार्चपासून 15 दिवसांची बंदी लावली होती. नंतर पुढील आदेशापर्यंत ताज बंद ठेवण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here