मुंबईवर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता,हाय अलर्ट जारी

मुंबई पोलिसांनी केला हाय अलर्ट जारी

terrorist-could-target-mumbai-police-announced-on-high-alert
terrorist-could-target-mumbai-police-announced-on-high-alert

मुंबई l मुंबईत सणासुदीच्या काळात अतिरेकी हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला असून गर्दीच्या ठिकाणी ड्रोन किंवा क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. terrorist-could-target-mumbai-police-announced-on-high-alert

वाचा l भाजपातील हिंदुत्ववाद्यांनी गाईवरून हिंदू-मुसलमानांत दंगली भडकवल्या : शिवसेना

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेला लॉकडाऊन आता टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत असून सर्व गोष्टी खुल्या केल्या जात आहेत. त्यामुळे बाजारपेठात गर्दी होऊ लागली आहे. आता सणासुदीचा काळ असून त्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी ड्रोन किंवा क्षेपणास्त्राद्वारे हल्ला केला जाऊ शकतो, असा अलर्ट देण्यात आला आहे.

वाचा l  …नारायण राणेंची काय किंमत आहे;अशोक चव्हाणांचा टोला

३० ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर पर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. या काळात मुंबईमध्ये सुरक्षा बंदोबस्त देखील वाढवला जाऊ शकतो. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कलम १८८ अतंर्गत कारवाई होऊ शकते.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here