TET च्या ७८७४ अपात्र उमेदवारांपैकी ५७६ शिक्षक नोकरी करताना मैपिंगमध्ये सापडले, त्यात तुमचे तर नाव नाही ना?

tet-scam-news-updates-tet-passed-76-candidates-certificate-invalid-in-beed-know-details-maharashtra-news-update-today
tet-scam-news-updates-tet-passed-76-candidates-certificate-invalid-in-beed-know-details-maharashtra-news-update-today

मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टी.ई.टी.) परीक्षा २०१९ मधील ७८७४ अपात्र (Tet Scam 2019) उमेदवारांपैकी ५७६ शिक्षक विविध शाळांमध्ये नोकरी करुन पगार उचल होते. जि.प अथवा खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित/विना अनुदानित शाळेत कार्यरत होते. त्या शिक्षकांचा महाआयटीकडून मैपिंगव्दारे शोध घेतला असता त्यामध्ये ते सापडले. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

१९ जानेवारी, २०२० या परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकारामुळे दाखल झालेल्या गुन्ह्याचे अनुषंगाने गैरप्रकारामध्ये समाविष्ट उमेदवारांची संपादणूक रद्द करणे व शास्ती निश्चित करणे याबाबत आयुक्त परीक्षा परीषद, पुणे यांचेकडून दि.०३.०८.२०२२ अन्वये ७८७४ अपात्र उमेदवारांची यादी प्राप्त झाली होती. त्यातील परीक्षार्थी जि.प अथवा खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित/विना अनुदानित शाळेत कार्यरत असल्यास व सदर सेवेच्या अनुषंगाने त्यांना शालार्थ आवडी प्रदान केलेला असल्यास शिक्षण संचालक यांनी त्यांचे स्तरावरुन प्रथमतः सदर शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठविण्यात यावेत असे निर्देश होते.

ज्याअर्थी, महाराष्ट्र शिक्षक पात्रता (टी.ई.टी.) परीक्षा २०१९ मधील ७८७४ उमेदवारांनी गैरप्रकार केल्याने चौकशी अंती त्यांना अपात्र केले आहे. सदर उमेदवारांची यादी दिनांक १०.०८.२०२२ नुसार महाआयटी, मुंबई यांना नावानुसार व आधार क्रमांकानुसार मॅपिंग करण्यासाठी देण्यात आली होती.

महाआयटीकडून मैपिंग करून प्राप्त यादीनुसार अपात्र उमेदवारांपैकी ५७६ उमेदवार राज्यातील जिल्हा परिषद, मनपा/नपा/नप/कटक मंडळे, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणसेवक सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत आणि शालार्थ प्रणालीव्दारे वेतन अनुदान घेत आहेत.

त्याअर्थी, शासन पत्र क्र. २०२२/प्र.क्र.४४/ टीएनटी-१, दि. १० जून २०२२ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन दिनांक १७.०८.२०२२ च्या संदर्भ ४ च्या आदेशान्वये उक्त प्रकरणी महाआयटी, मुंबई यांचेकडून प्राप्त यादीनुसार प्राथमिक शाळामध्ये कार्यरत व शालार्थ आयडी धारक सोबतच्या यादीतील एकूण ५७६ उमेदवारांचे शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठविण्यात आलेले आहेत.

उपरोक्त गोठविण्यात आलेल्या शालार्थ आयडी उमेदवारांची नावे माहे ऑगस्ट २०२२ च्या वेतन देयकामध्ये समाविष्ट असण्याची शक्यता असल्याने सदरचे वेतन देयक रद्द करून संबंधिताचे नाव देवकातून वगळून माहे ऑगस्ट २०२२ चे वेतन देयक तयार करून अन्य कर्मचान्यांचे वेतन अनुदान अदा करण्याची कार्यवाही करावी. तसेच शालार्थ आयडी गोठविण्यात आलेल्या उमेदवारांचे माहे ऑगस्ट २०२२ पासून ऑनलाईन अथवा ऑफलाईन वेतन अनुदान अदा होणार नाही याची सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी.

सदर प्रकरणी उमेदवारांना वेतन अनुदान अथवा फरक देयक अदा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकान्यांवर नियमानुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल याची नोंद घ्यावी असे पत्रक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे शिक्षण संचालक डॉ. दिनकर पाटील यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, सर्व  शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, प्रशासन अधिकारी, मनपा सर्व अधीक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक), मुख्याधिकारी / प्रशासन अधिकारी, न.पा./न.प/कटक मंडळे सर्व सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांना माहितीस्तव पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here