वक्फ जमिनीवरील अतिक्रमण करणाऱ्यांची आता खैर नाही…!

वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आ. डॉ. वजाहत मिर्झा यांचा इशारा

The encroachers on waqf land are no longer good...!
The encroachers on waqf land are no longer good...!

औरंगाबाद : वक्फ मंडळाच्या waqf board जमीनीवरील अतिक्रमण, कब्जा करणाऱ्यावर आता कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बेकायदा विक्री व हस्तांतरण करणाऱ्यांची ही आता खैर नाही.  वक्फ सदस्य जमिनींचा आढावा घेण्या साठी पुढच्या आठवड्यात राज्यभर दौरा करणार असून सोलापूर पासून त्याची सुरुवात होणार असल्याची माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष व आमदार डॉ.वजाहत मिर्झा यांनी दिली.

अन्यथा दोन वर्षांचा कारावास

वक्फ मंडळाची बैठक मुंबई, इस्लाम जिमखाना येथे पार पडली.यात जमिनीची देखभाल व अनागोंदी कारभार करणाऱ्या विरोधात कठोर कायदेशीर करण्याचा सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला.महाराष्ट्रातील अनेक जमीनीची बेकायदा खरेदी-विक्री व हस्तांतरण झाल्याचे निदर्शनास आले आहे.कलम ५१ अन्वये वक्फ मंडळाच्या विना परवानगी शिवाय असली कोणतीही कृती बेकायदा ठरते.असे असतांना ही काही भूमाफिया असले प्रकार करत असल्याचे समोर आले आहे.केंद्रीय कायदा १९९५ च्या कलम ५२ (ए) अन्वये दोन वर्षा पर्यंत सशक्त कारावास होऊ शकते.

विकासासाठी सल्लागार संस्था

वक्फच्या तरतुदी नुसार जमिनींच्या विकासासाठी कायदेशीर सल्लागार संस्थांची नियुक्ती करण्यास ही बैठकीत मान्यता देण्यात आली.या मुळे भविष्यात खाली असलेल्या जमिनींचा विकास होऊन त्यातून मंडळास भरगोस उत्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पॅनल ऑफ ऑडिडर्स

वक्फ मंडळाने नुकतेच वक्फ फंड न भरणाऱ्या राज्यातील तब्बल १२ हजार संस्थांना नोटीस बजावले होते.सदर संस्थांना लेखापरीक्षण करण्यास अडचण येऊ नये म्हणून पॅनल ऑफ ऑडिडर्सची सेवा राज्यस्तरावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी ही मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती डॉ.वजाहत मिर्झा यांनी दिली.

पुढच्या आठवड्यात वेबपोर्टल

राज्यातील संस्थांचे नोंदणीकरण प्रक्रियेस गती मिळावी म्हणून पुढच्या आठवड्यात वेब पोर्टल सुरु करण्याचा मानस असल्याचे ही डॉ.मिर्झा यांनी सांगितले.या बाबत संबंधितांची कोणतीही तक्रार येणार या साठी प्रशासनास तत्पर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे.वेब पोर्टल मुळे नोंदणीकरण प्रक्रिया जलदगतीने होणार आहे.

मुख्यालय इमारत स्वतःच्या जागेवर वक्फ मंडळ तब्बल पन्नास वर्ष पासून पाणचक्की परिसरात आहे. स्व:ताची मुख्यालय इमारत असावी या साठी आम्ही अनेक दिवसा पासून प्रयत्नशील आहोत. औरंगाबादच्या छावणी परिसरात वक्फ जमिनिवर जलप्राधिकरण बोर्डाची इमारत खाली पडली आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसा पासून पाठपुरावा करण्यात येत होता. मुख्यकार्यकारी अधिकारी मो. बा. ताशीलदार यांनी या इमारतीची पाहणी ही केली आहे. सदर इमारत हस्तांतरण करणे कामी राज्य शासन कडे मान्यतेस प्रस्ताव पाठविण्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीत मंडळाच्या वार्षिक अंदाजपत्रक मंजुरी देण्यात आली. असं ही डॉ. मिर्झा यांनी सांगितले.

बैठकीत वक्फ बोर्डाच्या सदस्या  खा. फौजिया खान, खा. इम्तियाज जलील, मौलाना अथर अली, मुदसीर लांबे, हसनैन शाकेर, समीर काजी, मुख्यकार्यकारी अधिकारी मो. बा. ताशीलदार, उपमुख्यकार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद तसेच वक्फ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here