मुंबई: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. १० जानेवारी २०२३ रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारी ही तारीख दिली होती. जर हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे पाठविण्याचे मंजूर झाले तर मग निकाल येण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागेल. उद्या सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देणार याकडे दोन्ही गटाचे आणि महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
“जर हे प्रकरण सात न्यायमूर्तींकडे पाठवलं नाही, तर घटनापीठ या प्रकरणात अंतिम निर्णय देईल. १४ ते २१ फेब्रुवारी दरम्यान या प्रकरणावर निकाल येणे अपेक्षित असणार आहे,” असं मत घटनातज्ज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी १० जानेवारी रोजी व्यक्त केलं होतं.
उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आनंद दिघेंसह प्रकाश परांजपेंनाही होते मान्य; आनंद परांजपे यांनी जुनी छायाचित्र दाखवून केला दावा
उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पक्षावर लादण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाकडून होत असतानाच, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी हा आरोप खोटा असल्याचा दावा केला आहे. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडुण आल्यानंतर प्रकाश परांजपे आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे हे पक्षाचे कार्याध्यक्षही नव्हते, असे सांगत आनंद यांनी या भेटीचे जुने छायाचित्र दाखवून या दोन्ही नेत्यांनाही उद्धव यांचे नेतृत्व मान्य होते, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.