नगरपालिका निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने: हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार, बोगस मतदान, पैसा व सत्तेचा निवडणुकीत प्रचंड गैरवापर.

The ruling parties' victory in the municipal elections was due to the blessings of the Election Commission: Harshvardhan Sapkal
The ruling parties' victory in the municipal elections was due to the blessings of the Election Commission: Harshvardhan Sapkal

मुंबई : नगरपालिकानगरपरिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाचा गलथान कारभार अधिरेखीत झाला आहे. मतदान प्रक्रियेचा पुरता गोंधळ घातला गेलातारिख पे तारिख चा खेळ केला. ही निवडणूक फ्रि अँड फेअर अशी झाली नाही. सत्ताधारी पक्षाकडून सामदामदंडभेद या नितीचा मुक्तपणे वापर करण्यात आला. निवडणुकीत बोगस मतदारदडपशाहीसत्तेचा गैरवापर आणि पैशाचा प्रचंड वापर पहायला मिळाला. सत्ताधारी पक्षांच्या विजयात निवडणूक आयोगाची मदत सर्वात महत्वाची ठरली आहेअशी प्रतिक्रीया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshwardhan Vasantrao Sapkal यांनी दिली आहे.

निवडणूक निकालावर प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कीभाजपा महायुती सरकारच्या कामावर जनता प्रचंड नाराज आहे. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहेजनतेची कामं होत नाहीतअशा परिस्थितीत आज आलेले निकाल जनतेचा कौल वाटत नाही. लोकशाही व संविधानाची पायमल्ली करत खुलेआमपणे दडपशाही करण्यात आली. निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहे. निवडणूक आयोगाचा गोंधळी कारभार व सत्ताधारी पक्षांचा पैसा फेक तमाशा देखहा खेळ या निवडणुकीत पहायला मिळाला. या सर्व पार्श्वभूमीमुळे काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळालेले नाही. काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी काँग्रेस पक्ष लोकशाही व संविधान रक्षणासाठी संघर्ष करत राहिलआमची ही वैचारिक लढाई आहे असे सपकाळ म्हणाले.

नगरपालिका निवडणुकीत भाजपाला मिळालेले यश हे एकनाथ शिंदेंची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी धोक्याची घंटा आहे. शत प्रतिशत भाजपासाठी या दोन मित्रपक्षांना भाजपा बाहेरचा रस्ता दाखवेलअसेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here