‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या डिजिटल विभागाची राज्य कार्यकारिणी जाहीर, प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड, सरचिटणीस के. अभिजीत, नीलिमा राऊत

न्यूज पोर्टल, यू-ट्युब चॅनेलसाठी पॉलिसी राबवणार

The state executive of the digital department of 'Voice of Media' has been announced, Jaipal Gaikwad as the regional president, general secretary K. Abhijit, Neelima Raut
The state executive of the digital department of 'Voice of Media' has been announced, Jaipal Gaikwad as the regional president, general secretary K. Abhijit, Neelima Raut

मुंबई:देशात तेवीस राज्यांत १८ हजार पत्रकारांना सोबत घेऊन काम करणाऱ्या पत्रकारांच्या, पत्रकारितेच्या हितासाठी लढा देणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या (Voice Of Media) डिजिटल मीडिया विभागाची (Digital Department) पत्रकारांची राज्य कार्यकारिणी आज ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष राजा माने यांनी  जाहीर केली.

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘डिजिटल मीडिया’ विभाग प्रदेशाध्यक्षपदी जयपाल गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. गायकवाड हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेत काम करीत आहेत. गायकवाड आता ‘ई-चावडी’ या न्यूज पोर्टलचे संपादक आहेत. ‘डिजिटल मीडिया’च्या राज्य टीममध्ये ‘डिजिटल मीडिया’त काम करणाऱ्या दिग्गज पत्रकारांना घेण्यात आले आहे. यामध्ये कार्याध्यक्ष योगेश कुटे संपादक लेट्सअप, मनोज साखरे दिव्य मराठी, उपाध्यक्ष महेश गलांडे लोकमत, अशोक गव्हाणे सकाळ, सरचिटणीस के. अभिजित एनजीओ खबर, नीलिमा राऊत डिजिटल जर्नलिस्ट, सहसरचिटणीस प्रवीण खुंटे एएसपी मीडिया, मीनल गांगुर्डे न्यूज १८ लोकमत, प्रवक्ता प्रथमेश पाटील इंडी जर्नल, संघटक अरुंधती गडाळे कुअॅप, कार्यवाहक भागवत पेटकर डेलीहंट, तुषार भामरे जळगाव लाईव्ह, संघटक योगेश गायकवाड सलाम पुणे, अमित उजागरे ई-सकाळ, अक्षय कांबेकर पब्लिक वाईब न्यूज अॅप, प्रसिद्धी प्रमुख किशोर ससाणे ललकारी, सदस्य अभिजित कांबळे संपादक महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन, सोनल महाडिक लोकमत,  तेजस शेलार अहमदनगर लाईव्ह, अविनाश पथक संपादक पंचनामा, महेश घोलप टीव्ही ९, सूरज पाटील मुंबई तक, मनीष भंडारी वेटून्यूज, गौतम संचेती दर्पण लाईव्ह यांची निवड करण्यात आली आहे.

 सर्व पदाधिकारी यांना शुभेच्छा देत राजा माने म्हणाले, काळाप्रमाणे पत्रकारिता बदलली आहे, डिजिटल मीडियाच्या बाबतीत होत चाललेला बदल सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. त्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ राज्यभरात पुढाकार घेईल. 

‘डिजिटल मीडिया’ला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात घेऊ…

‘डिजिटल मीडिया’ला पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहात घेतले जात नाही. ‘डिजिटल मीडिया’चे काम करणाऱ्यांना त्यांचे अधिकार मिळत नाहीत. ‘डिजिटल मीडिया’तल्या सर्व पत्रकारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांचे अधिकार मिळवून देणे यासाठी आमची लढाई असेल. यासाठी पॉलिसी बनवून ती पॉलिसी राज्य, केंद्राकडून अमलात आणली जाणार आहे.

संदीप काळे ,संस्थापक अध्यक्ष(व्हॉईस ऑफ मीडिया)

राज्यभरातील न्यूज पोर्टल, न्यूज यू-ट्युब चॅनेलमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांसाठी आम्ही काम करीत राहू. येत्या दहा फेब्रुवारीपर्यंत राज्यातील सर्व विभाग, जिल्हा, तालुक्याचे, अध्यक्ष, सर्व कार्यकारिणी घोषित केली जाणार आहे, अशी माहिती नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष जयपाल गायकवाड यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here