हिरव्या व भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव : हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : तिरंगा देशाची आनबान आणि शान आहेतिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनातघराघरात तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प करावाअसे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ Harshwardhan Vasantrao Sapkal यांनी केले आहे.

काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात संपन्न झाला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडेअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रफुल्ल गुडदे पाटीलप्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्माप्रदेश सरचिटणीस जोजो थ़ॉमसझिशान अहमदश्रुती म्हात्रे यांच्यासह काँग्रेस सेवादलाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सर्वांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्याते पुढे म्हणाले कीस्वातंत्र्याचा लढा व स्वातंत्र्यानंतर देश उभारणीत काँग्रेस पक्षाचा सिंहाचा वाटा आहेही एक मोठी साधना आहे आणि साधनेला संघर्षाची जोड आहे. संघर्षाचा हा मुलमंत्र आपण जपला पाहिजे. आज देशात काही शक्ती जातीपातीचेधर्माचे राजकारण करत आहेत. कोणाला हिरव्या रंगाचे तर कोणाला भगव्या रंगाचे राजकारण करायचे आहे. हिरवा व भगवा या रंगाचा आदरच आहे. हिरवा रंग सुबत्तेचे तर भगवा रंग हा त्यागाचेसन्मानाचे प्रतिक आहेतिरंगा हा एक विचार आहेस्वप्न आहे त्यासाठी आम्ही आजही रक्त सांडण्यास तयार आहोत असे सपकाळ म्हणाले.

भारतीय जनता पक्ष व एमआयएम या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. मोहम्मद अली जिना यांच्या पक्षाबरोबर जनसंघाने निवडणुका लढवल्या व त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलेत्या सरकारमध्ये जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी उपमुख्यमंत्री होतेआज त्याचे पुनरुज्जीवन केले जात आहेअसेही सपकाळ म्हणाले.

खरा आका हे देवेंद्र फडणवीसच…

सातारा जिल्ह्यातील ड्रग्जप्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले कीयाआधी सातारा जिल्ह्यात ड्रग्जचा एक कारखाना सापडला होतातो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या शेतात होतायाठिकाणी काम करणाऱ्या ४३ पैकी ४० बांग्लादेशी कामगारांना सोडून देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना क्लिन चिट देऊन टाकली. त्यावेळीच कठोर कारवाई केली असती तर आज पुन्हा ड्रग्जचा मोठा साठा सापडला नसता. या ड्रग्जच्या काळ्या धंद्यातून आलेला पैसा मतदार व विरोधी पक्षांचे लोकप्रतिनिधी खरेदी करण्यासाठी केला जात आहे. या सर्व प्रकरणाचा खरा आका हे देवेंद्र फडणवीसच आहेतअसा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी केला आहे.

संविधानिक पदाचा अपमान करणाऱ्या कोश्यारींना पद्म पुरस्कार…

भगतसिंह कोश्यारी हा विकृत माणून असून संविधानिक पदाचा त्यांनी अपमान केलेला आहे. संविधानाची पायमल्ली करणाऱ्या तसेच शिवशाहूफुले यांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला आहे. पुण्यातील एका सामाजिक संस्थेने मला पुरस्कार जाहीर केला होतामात्र तो पुरस्कार कोश्यारी यांच्या हस्ते देण्यात येणार होतात्यामुळे मी त्या पुरस्काराला नकार दिलाअसेही सपकाळ म्हणाले..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here