कसबा पेठ व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीत ‘या’ नेत्यांचा समावेश!

काँग्रेसचे हे स्टार प्रचारक दोन्ही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतील.

Congress Divisional Review Meetings to Prepare for Lok Sabha Elections
Congress Divisional Review Meetings to Prepare for Lok Sabha Elections

मुंबई : कसबा पेठ व चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असून २६ फेब्रुवारीला या दोन मतदारसंघात मतदान होत आहे. या मतदार संघातील निवडणूक प्रचारासाठी काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

या स्टार प्रचारकांमध्ये, महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, चंद्रकांत हंडोरे, आ. प्रणिती शिंदे, माजी मंत्री आ. डॉ. नितीन राऊत, आ. विजय वडेट्टीवार, आ. सुनिल केदार, आ. यशोमती ठाकूर, आ. अमित देशमुख, आ. सतेज पाटील, आ. डॉ. विश्वजित कदम, खासदार कुमार केतकर, खा. इम्रान प्रतापगडी, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा समावेश आहे.

काँग्रेसचे हे स्टार प्रचारक दोन्ही मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here