अमृता फडणवीस यांनी ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून गाणं थांबवावं; ऑनलाइन याचिका

अमृता फडणवीस Amruta-fadnavis यांचं येत्या गुरुवारी गाणं येणार

to-protect-the-environment-by-requesting-amruta-fadnavis-not-to-sing-to-stop-the-sound-pollution-online-petition-filed
to-protect-the-environment-by-requesting-amruta-fadnavis-not-to-sing-to-stop-the-sound-pollution-online-petition-filed-

मुंबई l विरोधीपक्ष नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra fadnavis यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amruta-fadnavis यांचं येत्या गुरुवारी गाणं येणार आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी हे गाणं प्रकाशित केलं जाऊ नये not-to-sing अशी मागणी करणारी ऑनलाइन याचिकाच sound-pollution-online-petition-filed चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर तयार करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे काही तासांमध्ये ४०० हून अधिक जणांनी या ऑनलाइन याचिकेचं समर्थन केलं आहे. येत्या गुरुवारी माझं अजून एक गाणं येत आहे त्यावरही ट्रोलिंग करा. सर्वांच स्वागत आहे,” असं म्हणत अमृता फडणवीस यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या नवीन गाण्याची घोषणा केली.

हेही वाचा : CBI च्या ताब्यातील ४५ कोटींचं १०३ किलो सोनं गायब

मात्र अमृता यांनी केलेली घोषणा आणि त्यामधील ट्रोलिंगचं आमंत्रण नेटकऱ्यांनी फारच गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळेच अमृता यांच्या गाण्यासंदर्भातील बातमी समोर आल्यानंतर हे गाणं येण्याआधीच आता नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

अमृता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये येत्या गुरुवारी मी गायलेलं एक गाणं प्रदर्शित होत असून हे गाणं एका सस्पेन्स चित्रपटातील आहे असं सांगितलं. तसेच हे येणारं नवीन गाणं हे प्रमोशनल साँग असून प्रत्यक्षात चित्रपटातही त्याचा वापर करण्यात आला आहे.

हे गाणं एन्जॉय करा, ट्रोल करा पण नक्की पाहा असं आवाहनही अमृता यांनी केलं. मात्र हे गाणं प्रदर्शित होण्याआधीच अमृता यांना ट्रोलर्सने पुन्हा लक्ष्य केलं आहे.

हेही वाचा l Green-peas benefits l मटार खाण्याचे १० फायदे माहित आहेत का?

चेंज डॉट ओआरजी या वेबसाईटवर हुनमंत ढोमे नावाच्या युझरने सोमवारी (१४ डिसेंबर २०२०) रोजी ‘पर्यावरणाचे सौरक्षण करण्यासाठी आणि ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी अमृता फडणवीस यांनी गाऊ नये,’ अशी ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. 

to-protect-the-environment-by-requesting-amruta-fadnavis-not-to-sing-to-stop-the-sound-pollution-online-petition-filed-

या ऑनलाइन याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये अमृता यांचा उल्लेख मामी असाही करण्यात आलाय. “पुढच्या गुरुवारी मामींचे नवीन गाणे येणार आहे. या गाण्याने होणारे ध्वनिप्रदूषण माणसाला घातक ठरू शकते.

हेही वाचा l Dry ginger benefits l जाणून घ्या सुंठ पावडर खाण्याचे फायदे

हे गाणे त्यांनी रिलीज करू नये यासाठी आपण पेटीशन साइन करणे गरजेचे आहे,” असं या याचिकेच्या डिस्प्रिप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे, “आपला कान, आपली जबाबदारी” असंही लिहिण्यात आलं आहे.

हेही वाचा : Nokia ची लॅपटॉप सेगमेंटमध्ये एंट्री, Nokia PureBook X14 झाला लाँच

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here