Coronavirus Updates Maharashtra l महाराष्ट्रात दिवसभरात 8 हजार 988 नवीन कोरोनाबाधित; 60 रुग्णांचा मृत्यू

today-newly-9855-patients-have-been-tested-as-positive-in-maharashtra
today-newly-9855-patients-have-been-tested-as-positive-in-maharashtra

मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (गुरूवार) दिवसभरात  8 हजार 988 नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.३९ टक्के आहे. याशिवाय आज दिवसभरात ६ हजार १३५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. today-newly-9855-patients-have-been-tested-as-positive-in-maharashtra

आजपर्यंत एकूण २०,४९,४८४ कोरोनाबाधित रुग्ण घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  (रिकव्हरी रेट) ९३.६६ टक्के एवढा झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६५,९६,३०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,८८,१८३ (१३.१८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात ३,९१,२८८ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत, तर ४ हजार  १०९ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. राज्यात आज रोजी एकूण ८५,१४४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून देशाच्या आणि महाराष्ट्राच्याही अनेक भागांमध्ये अनेक नागरिक कोरोना संपल्याच्याच आविर्भावात वावरत असल्याचं दिसून आलं आहे. असंच काहीसं चित्र मुंबईत देखील पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत करोनासंदर्भातली बदलती आकडेवारी डोळ्यांसमोर ठेवणं आवश्यक आहे.

हेही वाचा: भाजपाने रामाच्या नावावर पैसे वसुलीचा ठेका घेतला आहे का? ; नाना पटोलेंचा हल्लाबोल

एकीकडे राज्यात काही जिल्ह्यांमध्ये करोनाबाधित वाढू लागल्यामुळे पुन्हा काही निर्बंध घालावे लागले असताना मुंबईत देखील पुन्हा निर्बंध घालण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. गेल्या २४ तासांतली मुंबईतली आकडेवारी पाहिल्यास राज्य सरकार पुन्हा निर्बंध लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here