टोमॅटो खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे जाणून घ्या

tomato for health benefits
टोँमॅटोचे गुणकारी फायदे tomato for health benefits

टोमॅटोचा वापर भाजी, आमटीपासून ते कोशिंबीरपर्यंत अनेक पदार्थांमध्ये केला जातो. त्यामुळे स्वयंपाक घरातील एक महत्त्वाची फळभाजी म्हणून टोमॅटोकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे टोमॅटो खाण्याचे अनेक गुणकारी फायदे आहेत. फायदे कोणते ते जाणून घेऊयात.

टोमॅटो खाण्याचे फायदे

वजन नियंत्रणात आणण्यासाठी टोमॅटोचं सेवन करावं. टोमॅटो खाल्ल्यामुळे पोट भरल्याची भावना निर्माण होते. त्यामुळे भूक मी लागते.

रातआंधळेपणा, दृष्टीदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा.

रक्ताची कमतरता (अ‍ॅनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.

यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.

मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.

टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.

टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कर्बोदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटो गुणकारी आहे. त्यामुळे आहारात नियमितपणे टोमॅटोचा वापर करावा.

मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.

(कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्ला आवश्यक घ्या)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here