‘गद्दार’ भाजपच्या चीन प्रेमाचा धिक्कार!: सचिन सावंत

बंदी घातलेले चीनी ऍप वापरतो महाराष्ट्र भाजप.

Gujarat CM-Bhupendrabhai-Patel-mumbai-sachin-sawant-congess-news-update
Gujarat CM-Bhupendrabhai-Patel-mumbai-sachin-sawant-congess-news-update

मुंबई : मोदी सरकारने चीनी कंपन्यांच्या ऍप्स वापरावर भारतात बंदी घातलेली असताना त्यांचाच भारतीय जनता पक्ष  अत्यंत निर्लज्जपणे बंदी घातलेली चीनी ऍप्स आजही वापरत असून भाजपाची ही कृती प्रचंड चिड आणणारी आहे. बंदी घातलेले चीनी ऍप वापरून भाजपाने चीनबद्दल आजही प्रचंड प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. भाजपच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा फुगा फुटला असून भाजप गद्दार असल्याची घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

सावंत पुढे म्हणाले की, चीनने आगळीक करत भारताच्या सीमेत घुसखोरी करुन २० भारतीय सैनिकांची हत्या केली त्यावेळी देशभरातून प्रचंड संताप व्यक्त होत असताना काहीतरी कारवाई केल्याचे भासवण्यासाठी चीनी कंपन्यांच्या ५९ ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यामध्ये कॅमस्कॅनर (CamScanner) या ऍपचाही समावेश आहे. परंतु महाराष्ट्र भाजपा आजही हे ऍप वापरत आहे. कालच (दि. २४ ऑगस्ट २०२०) जारी केलेल्या एका प्रेस नोटसाठी त्यांनी बंदी घातलेल्या कॅमस्कॅनर या ऍपचा वापर केलेला आहे.

मोदी सरकारने बंदी घातलेली असतानाही अशी ऍप्स वापरणारे महाराष्ट्र भाजपा हे भारतात नाही का? का त्यांना विशेष सवलत देण्यात आली आहे ? असे सवाल उपस्थित करुन चीनी ऍप्सवर बंदी घालण्याचा मोदी सरकार निर्णय आणि ‘आत्मनिर्भर अभियान’ हे सुद्धा धुळफेकच आहे. स्वतः खोट्या राष्ट्रप्रेमाचे गोडवे गायचे आणि दुसऱ्यांना मात्र देशद्रोही ठरवायचा भाजपा व त्यांच्या परिवारातील संघटनांचा उद्योग सुरुच असतो. मात्र त्यांचे हे राष्ट्रप्रेम बनावटी असून त्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा उघडा पडला आहे, असे सावंत म्हणाले. 

चीनने सीमेवर आगळीक केल्यानंतर देशभरातील संतापाचे भांडवल करत भाजप व त्यांच्या समर्थक संघटनांना राष्ट्रप्रेमाची भरती आली होती. चीनी कंपन्यांचे कोणतेही साहित्य खरेदी करु नये, ‘बॅन चायना’ या कॅम्पेनमध्ये हेच ‘तथाकथीत राष्ट्रप्रेमी’ लोक होते. विशेष म्हणजे बंदी घातलेले चीनी ‘टीकटॉक’ हे आपल्या खास उद्योगपती मित्राला मिळावे यासाठी धडपड कोण करत होते, हेही काही लपून राहिलेले नाही, अशा खरमरीत शब्दात सावंत यांनी भाजपाच्या खोट्या राष्ट्रप्रेमाचा बुरखा फाडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here