Aurangabad waluj accident: औरंगाबादेत दुचाकीस्वारांना ट्रकने चिरडले: दोन बहिणी व भाऊ जागीच ठार!

truck-bike-accident-in-waluj-midc-aurangabad-two-brother-and-sister-killed-news-update-today
truck-bike-accident-in-waluj-midc-aurangabad-two-brother-and-sister-killed-news-update-today

औरंगाबाद: भरधाव ट्रक आणि दुचाकीच्या भीषण अपघातात तिघेजण ठार झाले ही घटना आज गुरुवार (ता.२४) रोजी सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास वाळूज एमआयडीसी (Aurangabad waluj accident) येथे घडली. येथील एनआरबी बेअरिंग कंपनीच्या समोरील चौकात हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन बहिणी व एका भावाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिपक लोखंडे (वय 20), अनिता लोखंडे (वय 22) आणि निकिता लोखंडे ( वय 18), अशी मृतांची नावे आहेत. ते रांजणगाव येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.

वाळूज एमआयडीसीत (waluj Midc) नियमितणे सकाळची पहिली शिफ्ट सुरू होण्याची घाई असल्याने कंपनीत जाण्यासाठी कामगारांची लगबग सुरू होती. दिपकही आपल्या बहिणीला येथील रेणुका ऑटो कंपनीत सोडण्यासाठी जात होता. याच दरम्यान भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली.

ट्रकच्या चाकाखाली आल्याने गतप्राण

ट्रकच्या धडकेमुळे दुचाकी चालक दिपक लोखंडे आणि मागे बसलेल्या त्याच्या दोन बहिणी असे तिघेही ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच गतप्राण झाले, अशी माहिती अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या मनोज जैन यांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना रुग्णाहिकेतून घाटी रुग्णालयात हलवले.

या अपघातानंतर वाळूज एमआयडीसी मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सकाळी साडे आठ-नऊ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघाताची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील कारवाई आता केली जातेय.

एमएच 04 एफजे 5288 क्रमांकाच्या ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन कामगार जात होता. यात एक पुरुष आणि अन्य दोन महिला होता. या तिघांनाही ट्रकने चिरडलं. हा अपघात इतका भीषण होता की तिघांवरही जागच्या जागीच काळानं घाला घातला.

या अपघातात मृ्त्यू झालेल्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघातानंतर या मार्गावरील बघ्यांची गर्दी जमली होती. सोबत ट्रकही रस्त्याच्या बाजूला अडवण्यात आला होता. त्यामुळे या मार्गावर प्रचंड कोंडी झाली होती.

औरंगाबादमध्ये कालही दुचाकींचा विचित्र अपघात झाला होता. दुचाक्यांच्या झालेल्या धडकेत दोन तरुण हवेत फेकले गेले होते. त्यानंतर ट्रॅक्टरखाली येऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here