गुजरातमध्ये अपघात: ट्रकने फुटपाथवर झोपलेल्या 15 मजुरांना चिरडले

truck-crushed-20-workers-sleeping-on-the-sidewalk-killing-15-incident-at-kosamba-in-surat-news-and-updates
truck-crushed-20-workers-sleeping-on-the-sidewalk-killing-15-incident-at-kosamba-in-surat-news-and-updates

सुरत: गुजरातच्या सुरतमध्ये surat मोठा अपघात घडला आहे. कोसांबामध्ये kosamba एका ट्रकने 15 मजुरांना चिरडले. पोलिसांनी सांगितले की, ट्रक आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला त्यानंतर ट्रक फूटपाथवर झोपलेल्या मजुरांच्या अंगावर गेला. सर्व मजुर राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील रहिवासी होते.

सोमवारी रात्री किम-मांडवी मार्गावरीस पालोडगाम जवळ ही दुर्घटना घडली. फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबाला ट्रकने चिरडले. यामध्ये 15 जण जागीच ठार झाले तर 6 जण गंभीर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. उपचारादरम्यान आणखी एकाचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालक आणि क्लिनरला अटक केली आहे.

मृतांमधील राकेश रूपचंद घटनास्थळापासून जवळच असलेल्या एका दुकानात काम करत होता. तो दररोज दुकानाजवळील एका केबिनमध्ये झोपायचा.

मात्र सोमवारी केबिनऐवजी तो मजुरांसोबत फुटपाथवर झोपला आणि त्याच्यावर काळाने घाला घातला. ट्रकच्या धडकेत 4-5 दुकानांचे शेड देखील तुटले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, ट्रकची ऊसाच्या ट्रॅक्टरसोबत धडक झाली. या धडकेनंतर ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक फुटपाथवर गेला. या अपघाता प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

हेही वाचा : किसानों और सरकार के बीच आज की बैठक टली, अब कब होगी बातचीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here