तृप्ती देसाई अखेर पोलिसांच्या ताब्यात

शिर्डीला जाण्यापासून देसाईंना रोखलं

trupti-desai-was-stopped-by-police-at-supe-toll-plaza-desai-insists-on-going-to-shirdi
trupti-desai-was-stopped-by-police-at-supe-toll-plaza-desai-insists-on-going-to-shirdi

शिर्डी l शिर्डी Shirdi येथील साई संस्थानने Saibaba Sansthan Shirdi महिलांच्या ड्रेसकोडाबाबत लावलेला फलक हटवण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई Trupti Desai या सकाळीच पुण्याहून Pune शिर्डीकडे जाण्यासाठी रवाना झाल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना अहमदनगरच्या सीमेवर सुपे टोलनाक्याजवळ रोखलं आणि ताब्यात घेतलं. 

तृप्ती देसाई साई संस्थानचा बोर्ड हटवण्यासाठी जात होत्या

तृप्ती देसाई म्हणाल्या,”साई संस्थानने महिलांच्या ड्रेसकोडबाबत लावलेला तो बोर्ड हटवण्यासाठी आम्ही शिर्डीला चाललो आहोत. याद्वारे आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न होत आहे.

आमचा हक्क मिळवण्यासाठी आम्ही शिर्डीकडे निघालो आहोत. मात्र, पोलिसांनी आम्हाला नगरच्या आधीच अडवलं असून याद्वारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पोलिसांनी कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही शिर्डीला जाणारच आहोत.

ड्रेसकोड फलक प्रकरण

शिर्डीमधील साई मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं असून भक्त मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी शिर्डी साई संस्थानकडून ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे.

मंदिरात येताना भक्तांनी सभ्य पोषाख परिधान करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून भक्त छोटे कपडे घालून मंदिरात येत असल्याची तक्रार आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुपे पोलीस ठाण्यात नेण्यात आले. यावेळी भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना आम्ही शिर्डीला जाण्यावर ठाम आहोत अशी भूमिका मांडली.

हेही वाचा l सुप्रसिद्ध संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here