मुंबई l अभिनेत्री दिव्या भटनागर Divya Bhatnagar हिचं कोरोनामुळे आज सकाळी निधन Dies झालं. छोट्या पडद्यावरील ‘ये रिश्ता क्या कहलाता हे’ yeh rishta kya kehlata hai मालिकेत ‘गुलाबो’ची भूमिका साकारणारी दिव्या हिच्यावर मुंबईतील गोरेगाव एसआरव्ही रुग्ण्लयात SRV Hospital उपचार सुरु होते.
दिव्याला २६ नोव्हेंबरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिचा कोरोना अहवाल २८ नोव्हेंबरला पॉझिटिव्ह आला होता. तिला आधीपासूनच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यामुळे तिची प्रकृती अधिकच बिघडत गेली.
ज्यामुळे तिचे निधन झाले. अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य आणि शिल्पा शिरोडकर यांनी तिच्या निधनानंतर सोशल मीडियावर शोक व्यक्त केला आहे.
दिव्याचा मित्र युवराज रघुवंशी याने तिच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. युवराजने सांगितले की, ‘दिव्याचं निधन आज पहाटे ३ वाजेच्या सुमारास झाले. दिव्याला ७ हिल्स रुग्णालयात हलविण्यात आले होते.
रात्री २ वाजता अचानक तिची प्रकृती अधिक बिघडली. तिला श्वास घेण्यास बराच त्रास होत होता, त्यानंतर ३ वाजता तिचं निधन झालं. ही बातमी माझ्यासाठी आणि दिव्याच्या कुटूंबासाठी मोठा धक्का आहे.’
[…] […]