ST: औरंगाबाद बसस्थानकात शौचालयाच्या पाण्यात दुचाकीची पार्किंग!

Two wheeler parking in toilet water at Aurangabad bus station!
Two wheeler parking in toilet water at Aurangabad bus station!

औरंगाबाद: औरंगाबाद एसटीच्या (ST Stand Aurangabad) मध्यवर्ती बस स्थानकात दुचाकी पार्कींगमध्ये शौचालयाच्या पाण्यातच दुचाकीची पार्किंग सुरु आहे. त्यामुळे वाहनांचेही नुकसान होत आहे. याकडे ठेकेदार, एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे प्रवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

औरंगाबाद शहरातील एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयातील दुचाकी पार्किंग ही खासगी ठेकेदाराकडून चालवली जाते. पार्किगची अवस्था अत्यंत वाईट असून तेथे चक्क शौचालयाचे पाणी पूर्ण पार्किंगमध्ये साचले आहे. शौचालयाच्या घाण पाण्यातच प्रवाशांना तसेच प्रवाशांच्या नातेवाईकांना, एसटी कर्मचा-यांना आपली वाहने उभी करावी लागत आहे. त्यामुळे घाण पाणी अंगावर उडत असून वाहनेसुध्दा खराब होत आहे. मात्र, याकडे एसटी प्रशासन, ठेकेदाराकडून लक्ष नाही. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

पार्किंगची जागा खड्डेमय..पार्किंगच्या जागेत भंगार तसेच संपूर्ण खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे वाहने उभी करताना वाहनधारकांना त्रास होत आहे. पार्कींगला उकीरड्याचे स्वरूप आले असून त्यामध्ये भंगारचे साहित्य पडलेले आहे. याकडे ना ठेकेदाराचे लक्ष आहे ना एसटी प्रशासनाचे

मनपाकडून तक्रारीनंतरही प्रतिसाद नाही…

मुख्य ड्रेनेजची लाईन चोकअप झाल्यामुळे घाणी पाणी साचत आहे. त्याबाबत आम्ही महापालिकेकडे तक्रार केली. आयुक्तांना भेटलो सुध्दा परंतु महापालिकेकडून कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. महापालिकेने ड्रेनेजचे काम केले तर ती समस्या सुटेल. पार्किंमधील खड्डे भरण्याबाबत ठेकेदाराकडून काही सूचना आल्या तर ते आम्ही भरू.

सचिन क्षीरसागर, विभाग नियंत्रक औरंगाबाद     

.                                                                                                         

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here