
आम्रपाली दुबे आणि दिनेश लाल यादव निरहुआ भोजपुरी सिनेप्रेमींची ही आवडती जोडी आहे. (निरहुआ आणि आम्रपाली दुबे (nirahua-aamrapali )यांच्या ‘राम लखन’ या हिट जोडीच्या ‘उडवला ये राजा’ गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. (udawala-ye-raja-ram-lakhan-nirahua-aamrapali-hit-bhojpuri-song )
असा होता निरहुआचा प्रवास
दिनेश लाल यादवने (निरहुआ ) 2012 मध्ये भोजपुरी चित्रपट गंगा देवी मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम केले होत. दिनेश भोजपुरी चित्रपटांमध्ये सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते आहेत. दिनेश ( निरहुआ ) अमिताभ बच्चन यांना आपले आदर्श मानतात.
निरहुआने एका वर्षात 5 भोजपुरी हिट चित्रपट दिले होते. पटना से पाकिस्तान,निरहुआ रिक्षवाला 2, जिगरवाला, राजाबाबू आणि गुलामी या भोजपुरी चित्रपटात हिट्स देण्याचा विक्रम त्याच्याकडे आहे.

आम्रपालीला डॉक्टर व्हायचं होतं
आम्रपालीचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील चंहार गावात झाला. तिनं मुंबईच्या भवन कॉलेजमधून पदवी संपादन केली. अभ्यासादरम्यान तिला सुरुवातीला डॉक्टर व्हायचं होतं. नंतर तिनं अभिनयात आपल्या कारकीर्दीची सुरुवात करुन लोकप्रियता मिळवली आहे.
