चिखली (जि.बुलढाणा): “मिंदे सरकारने राज्यपालांचा निषेध करण्याऐवजी त्यांची बॅग पॅक करून त्यांना पाठवून देण्याची हिंमत दाखवायला हवी होती. आम्ही ज्या त्वेषाने बोललो. त्या त्वेषाने बोलले का नाही? मी मुख्यमंत्री असताना राज्यपालांचा अगाऊपणा सहन करत नव्हतो. राज्यपाल म्हणून मी त्यांचा मान राखू शकतो. पण तुमच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलेलं आहे त्याचा मान मी राखू शकत नाही”, असा घणाघात करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आपली भूमिका ठणकावून सांगितली.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) ची जाहीर सभा आज शनिवारी चिखली जि.बुलढाणा येथे संपन्न झाली. यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्मंत्री उध्दव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप,शिंदे गटाचा जोरदार समाचार घेतला. यावेळी त्यांनी बुलढाण्याचे खासदार प्रताराव जाधव, वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
“महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जातात तरी शेपट्या घालून. महाराष्ट्रातील जिल्हे मागतात तरी तुम्ही शेपट्या घालून बसला. महिलेवर अपमान होतो , तेव्हाही शेपूट घालून. महाराष्ट्रात जे चाललं ते पसंत नाही असं म्हणून आता सरकारमधून बाहेर पडा. हिंमत असेल तर जाहीर करा. आज शहीद दिन असताना तुम्ही गुवाहाटीला जाता”, अशी टीका त्यांनी केली.
“तुम्ही महाराजांचा अवमान करत असाल तर तुमचं वय किती असेल तर तुम्ही घरात बसा. आम्ही सहन करणार नाही. महाराज जुने आदर्श कसे होऊ शकतात?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
“महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जातात तरी शेपट्या घालून. महाराष्ट्रातील जिल्हे मागतात तरी तुम्ही शेपट्या घालून बसला. महिलेवर अपमान होतो , तेव्हाही शेपूट घालून. महाराष्ट्रात जे चाललं ते पसंत नाही असं म्हणून आता सरकारमधून बाहेर पडा. हिंमत असेल तर जाहीर करा. आज शहीद दिन असताना तुम्ही गुवाहाटीला जाता”, अशी टीका त्यांनी केली.
“तुम्ही महाराजांचा अवमान करत असाल तर तुमचं वय किती असेल तर तुम्ही घरात बसा. आम्ही सहन करणार नाही. महाराज जुने आदर्श कसे होऊ शकतात?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना खासदार संजय राऊत, आ.डॉ.निलम गो-हे, खासदार अरविंद सावंत, खासदार विनायक राऊत, आमदार विनोद घोसाळकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते चंद्रकांत खैर, राजु वैद्य, श्रीराम झोरे, जिल्हा प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, कपिल खेडेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.