झुरळांनाही मिश्या असतात फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात…”, शिवसेनेचा संभाजी भिडेंवर हल्लाबोल

“हरियाणाची आग राजधानी दिल्ली आणि राजस्थानातही पेटू शकते. तशी…”, अशी शक्यताही ठाकरे गटाने व्यक्त केली आहे.

uddhav-thackeray-faction-shivsena-attacks-sambhaji-bhide-and-devendra-fadnavis-in-saamana-editorial-news-update-today
uddhav-thackeray-faction-shivsena-attacks-sambhaji-bhide-and-devendra-fadnavis-in-saamana-editorial-news-update-today

मुंबई: काही लोक मिशी व दाढीवर बोटे फिरवत उसने अवसान आणत आहेत. आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे, पण झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे मारावी लागतात. शिवरायांच्या महाराष्ट्रात आगी लावण्याचे कंत्राट कोणी घेतले असेल तर जनतेने सावध राहायला हवे. फडणवीसांना (fadnavis) गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर आहे, असा हल्लाबोल शिवसेनेने  ‘सामना’ अग्रलेखातून (Saamana Editorial) केला आहे.

“मणिपूर, हरियाणाच्या वाटेने महाराष्ट्र जाणार नाही. फडणवीसांना हे असे गुरुजी लाभल्यानेच महाराष्ट्र शिवरायांच्या, फुले, आंबेडकर, शाहूंच्या मार्गापासून भरकटताना दिसत आहे. पण, महाराष्ट्र हे शहाण्यांचे व शूरांचे राज्य आहे. शाईस्तेखानाची बोटे छाटणारा महाराष्ट्र झुरळांच्या मिश्यांची पर्वा कशाला करेल?” अशी अप्रत्यक्षपणे टीका ठाकरे गटाने संभाजी भिडे यांच्यावर केली आहे.

 “महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या गुरुजींनी…”

“मणिपुरात हिंसेचा आगडोंब पेटला असतानाच भारतीय जनता पक्षाच्या उपवस्त्रांनी आता हरयाणातही हिंसा भडकवून अनेकांचे बळी घेतले, मालमत्तेचे नुकसान केले. दहशतीचे वातावरण निर्माण केले. हरियाणाची आग राजधानी दिल्ली आणि राजस्थानातही पेटू शकते. तशी तयारी झाल्याची माहिती आहे. हरियाणा व राजस्थानात लवकरच विधानसभा निवडणुका होतील. त्याची ही पूर्वतयारी दिसते. इकडे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुले, संत साईबाबा, गांधी, नेहरू यांच्यावर घाणेरड्या भाषेत चिखलफेक करून माहौल बिघडवला आहे,” असा आरोप ठाकरे गटाने संभाजी भिडे यांच्यावर केला आहे.

 “फुल्यांचे वैचारिक वारसदार छगनराव भुजबळ हे फडणवीसांच्या…”

“लोकसभा निवडणुकीपूर्वी हे असे जातीय व धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण करायचे व जागोजागी ढोंगी हिंदुत्वाच्या घंटा वाजवून प्रचारात उतरायचे असे एकंदरीत कारस्थान दिसते. त्या पूर्वतयारीसाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, फडणवीसांची गुरुजी ब्रिगेड अशा फौजांना आधीच मैदानात उतरवले गेले आहे. महाराष्ट्रात फडणवीसांच्या गुरुजींनी महात्मा फुल्यांवर घाणेरडे विधान केले, तरीही फुल्यांचे वैचारिक वारसदार छगनराव भुजबळ हे फडणवीसांच्या मांडीस मांडी लावून सरकारात बसले आहेत. सत्तेसाठी विचारांना तिलांजली असेच एकंदरीत हे धोरण आहे,” असे टीकास्र ठाकरे गटाने छगन भुजबळ यांच्यावर सोडलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here